‘या’ राशींना दिवस जाईल चांगला ; पहा आजचे राशीभविष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑक्टोबर ।

मेष:-

आज काम करताना डोक्यावर फार ताण घेऊ नका. खूप दिवसांपासून राहिलेले वाचन पूर्ण कराल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. कामातून समाधान मिळवाल. गरज नसताना तर्क-वितर्क करू नयेत.

वृषभ:-

आज कुटुंबाकडून आनंद मिळेल. जुनी येणी वसूल होतील. आपला दिवस चांगला जाईल. मनातील चुकीच्या विचारांना थारा देऊ नका. मित्रांविषयी मनात ग्रह करून घेऊ नका.

मिथुन:-

आज घरातील कामात व्यस्त राहाल. कामात जोडीदाराची मदत होईल. कामात काही स्वाभाविक बदल संभवतात. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी सोडू नका. कठीण कामात चिकाटी सोडू नका.

कर्क:-

आज विद्यार्थ्यानी मेहनतीला कमी पडू नये. नवीन जबाबदारी अंगावर पडण्याची शक्यता. आवडीचे पदार्थ चाखाल. जवळच्या प्रवासात समानाची काळजी घ्या. नातेवाईकांची गाठ पडेल.

सिंह:-

आज स्वत:वर पूर्ण आत्मविश्वास ठेवा. दिवस चांगला जाईल. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पार पाडाल. जुन्या मित्रांशी संपर्क साधला जाईल. प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस.

कन्या:-

आज वैचारिक भावना वाढीस लागेल. घरातील लोकांचे सल्ले उपयोगी येतील. अधिक श्रम उपसावे लागू शकतात. एखादे जबाबदारीचे काम अंगावर पडू शकते. जोडीदाराची गरज लक्षात घ्या.

तूळ:-

आज व्यवसायात अधिकार प्राप्त होतील. दिवसाची सुरुवात संमिश्र असेल. दैनंदिन कामात अडथळे येऊ शकतात. मात्र आपण त्यातून मार्ग काढू शकाल. नातेसंबंध दृढ होतील.

वृश्चिक:-

आज नोकरीत मनासारखे काम मिळेल. कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ नये. प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस. नवीन ओळख होईल. येणार्‍या काळात ओळखीचा फायदा होईल.

धनू:-

आज आत्मविश्वासाने कामे कराल. मनात संशयाला थारा देऊ नका. तुमचे मार्गदर्शन इतरांना लाभदायक ठरेल. सासरच्या मंडळींकडून लाभाची शक्यता. मित्रांच्या मदतीने काही लाभ संभवतात.

मकर:-

आज गुंतवणुकी संदर्भात तज्ञांचा सल्ला घ्यावा. प्रलोभनाला भुलून जाऊ नका. दिवसाची सुरुवात उर्जेने होईल. व्यापारी वर्गाला उत्तम दिवस. चर्चेतून मतभेद संपुष्टात येतील.

कुंभ:-

आज काही खर्च अचानक येतील. अति तिखट पदार्थ टाळावेत. आरामाची इच्छा प्रबळ होईल. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. अनुभवी व्यक्तींच्या भेटीचा योग.

मीन:-

आजचा दिवस स्पर्धेत यश मिळवण्याचा आहे . जोडीदाराचा सल्ला घ्यावा. अचानक धनलाभाची शक्यता. महत्त्वाच्या गोष्टी गुप्त ठेवा. ध्यानधारणेतून मानसिक तणाव कमी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *