अल्कोहोल कधी एक्सपायर होतं का ? खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑक्टोबर । दारु तशी शरीरासाठी हानिकारक असते, डॉक्टर सुद्धा आपल्याला त्याच्यापासून लांब राहण्याचा सल्ला देतात. परंतु असे काही लोकं आहेत जे तरीही दारु पितात. काही लोकं कमी प्रमाणात पितात, तर काही त्याचा अतिरेक करतात. आता हे ज्याच्या त्याच्या इच्छेवरती आणि मनावरती अवलंबून आहे. परंतु त्याआधी तुम्हाला दारुबद्दल काही गोष्टी माहित असणे गरजेचे आहे.

जेव्हा तुम्ही दारू खरेदी करता, तेव्हा तुम्ही कधी त्याची एक्सपायरी डेट पाहिली आहे का? ही डेट क्वचितच कोणी पाहत असेल. बहुतेकदा असे म्हटले जाते की, वाइन जितकी जुनी असेल तितकी चांगली. तर मग दारूची एक्सपायरी डेट नसते का? आज, अल्कोहोलची एक्स्पायरी डेट आहे का आणि ते असल्यास ते किती दिवसांसाठी वापरले जाऊ शकते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू या.

अल्कोहोलची एक्स्पायरी डेट ही अल्कोहोलच्या प्रकारावर अवलंबून असते. म्हणजेच, काही वाईन आहेत ज्या बनवल्यानंतर वर्षभर प्यायल्या जाऊ शकतात, पण कालांतराने त्या पिणे चांगलं नाही, तर काही प्रकारचे वाइन असे आहेत ज्यांना काही वर्षे कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावे लागते, मग ते चांगले राहतात.

कोणत्या दारूची एक्सपायरी डेट नसते?
ज्या अल्कोहोलमध्ये स्पिरिट कॅटेगरी आहे त्याला एक्सपायरी डेट नसते. स्पिरिट्स कॅटेगरीमध्ये रम, जिन, वोडका, ब्रँडी, टकीला सारखे लिकर आहेत. म्हणजेच, ते कधीही खराब होत नाहीत.

याची बाटली उघडली तर काय होते?
जरी तुम्ही बाटली उघडली असली तरी तुम्ही ती अनेक वर्षे वापरू शकता. पण, यामुळे त्याच्या गुणवत्तेत फरक पडू शकतो

कोणत्या दारूची एक्सपायरी डेट असते?
जर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचे झाले तर वाइन आणि बिअरची एक्सपायरी डेट आहे. खरं तर, ही उत्पादने डिस्टिल्ड केलेली नाहीत, ज्यामुळे त्याची एक्सपायरी तारीख आहे आणि विशिष्ट वेळेत ते पिणे आवश्यक आहे. वाइनमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते खराब होण्याची शक्यता असते आणि त्याची एक्सपायरी डेट वाइनच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *