शिक्षकांना दिवाळीपूर्वी ऑक्टोबरचा पगार द्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑक्टोबर । राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचा पगार दिवाळीपूर्वी देण्यात यावा, अशी मागणी शिक्षक परिषदेने राज्य सरकारकडे केली आहे. शिक्षकांचे पगार मागील अनेक महिन्यांपासून उशिराने होत आहेत. दिवाळी हा सण 2 नोव्हेंबरपासून सुरू होत असून हा सण आनंदाने साजरा करता यावा, यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार मिळणे आवश्यक असल्याचे शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले. यासाठी 20 ऑक्टोबरपूर्वी वेतन अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणीही दराडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *