‘गर्व से कहो हम हिंदू है’ शिवसेना भवनासमोर मनसेची पोस्टरबाजी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ ऑक्टोबर । हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) शिवसेना भवनासमोर (Shiv Sena Bhavan) पोस्टर्स लावून शिवसेनेला डिवचल्याचं दिसून येत आहे. मनसेकडून दसऱ्याच्या (Dussehra) शुभेच्छा देणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सवर ‘गर्व से कहो, हम हिंदू है’ म्हटलेलं असून त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचा फोटोही पहायला मिळत आहे.

सेनाभवना समोर हे पोस्टर लावून एकीकडे मनसे हिंदूत्वाचा (Hundutva) नारा बुलंद करत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने हिंदूत्वापासून फारकत घेतली आहे असे दाखवण्याता प्रयत्न या पोस्टर मधून होत आहे. शिवसेनाचा आज दसरा मेळावा होत आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापूर्वी मनसेने असे पोस्टर्स लावून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून शिवसेनेवर सातत्याने हिंदूत्वापासून फारकत घेतल्याची टीका होत आहे. तर दुसरीकडे आगामी ननपा निवडणुकांत मनसे आणि भाजपची युती होणार असल्याची चर्चा रंगत आहे. त्यातच आता मनसेकडून हिंदूत्वाचा नारा देणारे पोस्टर्स मुंबईत झळकले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *