मुंबई लोकल प्रवास ; आता मुलांना आजपासून प्रवासाची मुभा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ ऑक्टोबर । Mumbai local travel news : कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक कमी होत आहे. त्याप्रमाणे रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात येत आहे. आता दसऱ्याच्या मुहूर्तावर 18 वर्षांखालील मुलांना आजपासून मुंबई लोकल रेल्वे प्रवासाची (Mumbai local trains) मुभा देण्यात आली आहे. लोकल प्रवासावेळी (Mumbai local) पास आणि ओळखपत्रही सोबत बाळगणे अत्यावश्यक असणार आहे. याबाबत मध्य आणि पश्चिम रेल्वेने तसे स्पष्ट केले आहे. (Mumbai local travel – All those under the age of 18 to be allowed to travel in local trains)

दरम्यान, शिवाय एखाद्या व्यक्तीला काही महत्त्वाच्या वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करायचा असल्यास त्यांनाही लोकल प्रवास करता येईल. त्यासाठीही डॉक्टरांकडून प्रमाणपत्र पुरावा म्हणून घ्यावा लागेल. हा पुरावा दाखवताच मासिक पास तिकीट खिडक्यांवर उपलब्ध होईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 18 वर्षांखालील मुलांना रेल्वेप्रवास करता येणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारच्या सूचनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने मुलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लोकल प्रवासासाठी मुला-मुलींना मासिक पासच घ्यावा लागणार आहे. त्यांना तिकीट काढण्याची अट आहे.

दरम्यान, रेल्वे मासिक पास घेण्यासाठी तिकीट खिडक्यांवर त्यांना पुरावा म्हणून ओळखपत्र दाखवावे लागेल. प्रवासावेळी पास आणि ओळखपत्रही सोबत बाळगणे बंधनकारक असणार आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपाठोपाठ कोरोना लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली होती. मात्र, 18 वर्षांखालील मुलांचे लसीकरण होत नसल्याने त्यांना लोकल प्रवास करता येत नव्हता. आता दोन डोस घेतलेल्या मुलांना प्रवास करता येणार आहे.

राज्य सरकारने शाळा सुरु केल्या आहेत. तसेच 20 ऑक्टोबरपासून महाविद्याल सुरु होणार आहेत. शाळा आणि महाविद्यालयात जाण्यासाठी त्यांच्यापुढे प्रवासाची मोठी अडचण होती. आता परवानगी मिळाली असल्याने लोकल प्रवास करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *