विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्रोल-डिझेल महाग

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑक्टोबर । देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये 35 पैशांनी वाढ झाली. दरवाढीचा हा विक्रम आहे. पेट्रोल-डिझेल आता विमानाच्या इंधनापेक्षाही महाग झाले आहे. विमानाचे इंधन 79 रुपये लिटर आहे.

मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 111.77 रुपये लिटर झाले आहेत तर दिल्लीमध्ये 105.84 रुपये लिटरवर पोहोचले आहे. मुंबई आणि दिल्लीत डिझेलचा दर अनुक्रमे 102.52 रुपये आणि 94.57 रुपये झाला आहे. या दरवाढीनंतर देशातील प्रत्येक राज्यामध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे तर डिझेलचे दरही डझनभर राज्यांमध्ये शंभर रुपयांवर गेले आहेत.

विमानासाठी लागणाऱया एव्हिएशन टर्बाईन फ्युएल (एटीएफ) इंधनाचे दर दिल्लीमध्ये 79020.16 किलोलिटर म्हणजेच 79 रुपये लिटर आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरांनी तो टप्पाही ओलांडून पार केला आहे. देशातले पेट्रोल-डिझेलचे सर्वाधिक दर राजस्थानच्या गंगानगर भागात आहेत. तिथे पेट्रोल 117.86 रुपये तर डिझेल 105.95 रुपये लिटर आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *