‘या’ कारणामुळे फेसबुकचे नामकरण करणार मार्क झुकेरबर्ग ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑक्टोबर । रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने जगातील आघाडीची सोशल नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या फेसबुक आयएनसी आपले नाव बदलण्याचा विचार करत असून यासंदर्भात पुढील आठवड्यामध्ये चर्चा होणार आहे. हे नाव बदलण्याचा विचार मेटाव्हर्स पद्दतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने सुरु असल्यासंदर्भातील वृत्त द व्हर्जने मंगळवारी दिले आहे.

या विषयावर कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये फेसबुक कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग बोलणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही बैठक २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. पण यासंदर्भातील निर्णय त्याआधीच घेतला जाण्याची शक्यता व्हर्जने आपल्या वृत्तामध्ये व्यक्त केली आहे.व्हर्चूअल विश्वाला अधिक प्राधान्य देण्याची भूमिका म्हणजेच मेटाव्हर्स. लोक जेव्हा इंटरनेटच्या माध्यमातून व्हर्चूअल विश्वामध्ये भ्रमंती करतात, त्याला मेटाव्हर्स असे म्हणतात. यामध्ये डिजीटल स्पेसचाही समावेश होतो. डिजीटल स्पेस म्हणजेच व्हर्चूअल रिअॅलिटी आणि ऑगमेन्टेट रिअॅलिटीसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभे केलेले आभासी जग होय. याच आभासी जगाला डिजीटल स्पेस असे म्हटले जाते.

कंपनी या रिब्रॅण्डींगच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली आणखीन एका मोठ्या श्रेत्रामध्ये पूर्णपणे वेगळी सेवा निर्माण करु पाहत आहे. या कंपनीच्या उप कंपन्यांमध्ये आधीच इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ऑक्युलस आणि इतर कंपन्या आहेत. पण सध्या सुरु असणाऱ्या या नाव बदलासंदर्भातील चर्चांवर आपण कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे फेसबुकने म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *