Todays Gold Rate ; सोने, चांदीच्या दरात घसरण वाढ ? ; जाणून घ्या आजचा भाव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ ऑक्टोबर । १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,४९० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,५१० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

काय आहे आजचा भाव?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,४९० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,४९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,६३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,८७० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,४९० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,४९० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६४६ रुपये आहे. कालच्या आणि आजच्या दरामध्ये ४ रुपयांचा फरक आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *