Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी आक्रमक ; बेमुदत उपोषणाचा इशारा - Maharashtra 24

दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी आक्रमक ; बेमुदत उपोषणाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ ऑक्टोबर । प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्यासह महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांना सुरक्षित सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. दिवाळीच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. विविध मागण्यांसाठी राज्य एसटी कर्मचारी कृती समितीच्यावतीनं एल्गार पुकारण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

27 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरु होणार आहे. एसटीचे राज्यसरकारमध्ये विलगीकरण करावे, पगारवाढ त्याचबरोबर महागाई भत्त्यात वाढ मिळावी यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली. आंदोलनाचा तिढा वेळी सुटला नाहीतर ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

दररोज सुमारे 65 लाख लोकांना सुरक्षित सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना वेळेववर वेतन दिलं जात नाही. कोरोना काळात एसटीच्या 306 कर्मचाऱ्यांनी प्राणाची आहुती दिली. एसटी कर्मचाऱ्यांना एच आर वेळेवर मिळत नाही, डीए वेळेवर मिळत नाही. राज्यातील प्रत्येक संकटाच्या वेळी एसटी कर्मचारी पुढं असतो. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी एक कृती समिती सर्व संघटनांनी मिळून स्थापन केलेली आहे.

समितीच्या बैठकीतील निर्णयाप्रमाणं तीन टप्प्यात आंदोलन करण्याच निश्चित करण्यात आलं आहे. दिवाळी तोंडावर आलेली त्या पार्श्वभूमीवर आम्ही 27 ऑक्टोबरपासून आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मोर्चा काढण्यात येईल. याशिवाय एसटीचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी अंतिम लढाईची तयारी एसटी कर्मचाऱ्यांनी केल्याचं एसटी कर्मचारी कृती समितीच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्टोबरपासून उपोषण सुरु केल्यास दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. राज्य सरकार आणि परिवहन मंत्री अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेणार का हे पाहावं लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *