Google चं हे नवं फिचर तुम्हाला घरबसल्या शिकवेल इंग्रजी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑक्टोबर । गुगलने काही दिवसांपूर्वी पिक्सेल लॉन्च इव्हेंटचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमादरम्यान Google ने Pixel 6 मालिकेतील नवीन स्मार्टफोन्स देखील लॉन्च केले. यानंतर Google कंपनीनं आपल्या Google Docs आणि Gmail मध्ये काही महत्त्वाचे अपडेट जारी केले. परंतु याचे कंपनीकडून अपडेट आणण्यात आलेलं नाही. गुगलनं आणखीन एक नवीन फिचर जाहीर केलं आहे, जे वापरकर्त्यांना गुगल सर्चद्वारे चांगले इंग्रजी शिकण्याची आणि त्यांची भाषा कौशल्ये सुधारण्यास मदत करेल. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Google ने एक ब्लॉग पोस्ट जारी केली आहे. ज्यामध्ये कंपनीने या नवीन फीचरबद्दल माहिती दिली आहे, हे नवीन फीचर लोकांना कशी मदत करेल. या वैशिष्ट्याचा वापर करून लोक वेगवेगळ्या इंग्रजी शब्दांबद्दल जाणून घेतीलच, पण त्यांची इंग्रजीबद्दलची उत्सुकताही वाढेल.

सोप्या भाषेत सांगायचे तर, गुगल सर्चच्या या नवीन वैशिष्ट्यामुळे वापरकर्ते दररोज सूचनांच्या स्वरूपात नवीन इंग्रजी शब्द शिकू शकतात. या सुविधेसाठी लोकांना सब्सक्राइब करणं आवश्यक असेल, त्यानंतर वापरकर्त्यांना दररोज नवीन शब्दांची सूचना मिळेल.

एवढेच नाही तर गुगल सर्च त्यांना जगाबद्दल एक रोचक वस्तुस्थिती देखील सांगेल. त्यामुळे लोकांना शब्द अधिक चांगल्या प्रकारे लक्षात ठेवण्यास मदत होईल.गुगल सर्चमध्ये हे फंक्शन सब्सक्राइब करणं खूप सोपं आहे. सर्व वापरकर्त्यांना साइन अप करण्यासाठी Google सर्चमध्ये कोणत्याही इंग्रजी शब्दाची परिभाषा पाहावी लागेल आणि वरती उजव्या कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा.

गुगलने हे वैशिष्ट्य फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध करून दिले आहे. गुगल कंपनीने म्हटले आहे की, ‘इंग्रजी शिकणारे आणि अस्खलित बोलणारे दोघांसाठी सारखेच शब्द तयार केलेले आहेत आणि लवकरच तुम्ही वेगवेगळ्या कठीण स्तरांचेही इंग्रजी निवडून शिकू शकाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *