5 वर्षात धोनीचे शब्द ठरले खरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑक्टोबर । धोनीने एक उत्तम खेळाडू आणि उत्तम कॅप्टन असल्याचे अनेकदा सिद्ध केलं आहे. तसेच आपल्या सगळ्यांना धोनीच्या दुरदृष्टीचा देखील अनुभव आला आहे. धोनी नेहमी खेळपट्टीचा अभ्यास करतो, तो खेळाडूंच्या मनाचा देखील अभ्यास करतो. त्यामुळेच तो एक यशस्वी कॅप्टन सिद्ध झाला आहे. परंतु आता धोनीबद्दल आणखी एक गोष्ट समोर आली आहे की, ती भारत आणि पाकिस्तानच्या खेळाशी संबंधीत आहे.

एमएस धोनीने ५ वर्षांपूर्वीच्या केलेल्या विधानावरती या वर्षी म्हणजे 2021मध्ये शिक्कामोर्तब झाले आहे. धोनीने 2016 मध्येच भारत-पाकिस्तान सामन्यांचा अंदाज लावला होता. तेव्हा तो म्हणाला होता की, एक दिवस भारत वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानकडून नक्कीच हरेल. आपण नेहमीच जिंकू हे होऊ शकत नाही, त्यामुळे एक दिवस पाकिस्तान नक्कीच भारताला हरवेल.

धोनीचे हे वाक्य काल म्हणजेच 24 ऑक्टोबरला खरं ठरलं, ज्यामुळे पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाला.

दुबईत पाकिस्तानने भारतावर विजय मिळवल्यानंतर महेंद्रसिंग धोनीचे 5 वर्षांपूर्वीचे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जे त्याने 2016 च्या टी -20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर म्हटले होते. धोनीने तेव्हा जे काही सांगितले होते ते 2021 मध्ये खरे ठरले.

2016 मध्ये धोनी काय बोलला होता?
धोनी म्हणाला, “अर्थातच आम्हाला या विक्रमाचा अभिमान वाटला पाहिजे की, वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानासमोर भारक कधीही हरला नाही. पण, नेहमीच असे होणार नाही. आज नाही, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 50 वर्षांनी, कधीतरी हे होणार आणि हे नक्की होणार. ”

धोनीने शेवटच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला हरवल्यानंतर जे काही बोलले होते, ते 5 वर्षांच्या कालावधीतच खरे ठरेल, हे कोणाला ठाऊक आहे मात्र हे खरे ठरले.

भारत -05, पाकिस्तान -01
टी -20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा विजय आणि पराभवाचा विक्रम आता 5-1 आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पाच वेळा विजय मिळवला आहेत. तर विराट कोहली भारताचे नेतृत्व करताना भारताचा पाकिस्ताकडून पराभव हा पहिला आणि शेवटचा असणार आहे.यावेळी धोनी अर्थातच संघाचा कर्णधार किंवा खेळाडू नव्हता. पण तो संघाचा मार्गदर्शक होता. आता धोनी जोपर्यंत खेळाडू होता तोपर्यंत पाकिस्तान त्याला हरवू शकत नव्हता. पण, एक मार्गदर्शक म्हणून पाकिस्तानविरुद्ध त्याची सुरुवात चांगली झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *