Diwali 2021: लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी लक्ष्मीसह विष्णूची पूजा का केली जात नाही?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑक्टोबर । दिवाळी (Diwali 2021) म्हणजे दिव्यांचा सण. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन (Laxmi puja date time muhurat) दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षाच्या अमावास्येला साजरी केली जाते. यावर्षी लक्ष्मीपूजन (Laxmipujan muhurat) 4 नोव्हेंबरला (गुरुवार) आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे.

संपूर्ण देशभरात या दिवशी लक्ष्मीचं पूजन होतं. सोबत गणपती, संपत्तीची देवता कुबेर, कालिकामाता आणि देवी सरस्वतीचं पूजन केलं जातं. पण तुम्हाला हे माहिती आहे का, लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीसह विष्णूची (Vishnu) पूजा केली जात नाही. या सर्व देवीदेवतांच्या पूजेदरम्यान या दिवशी भगवान विष्णूंची पूजा का केली जात नाही यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का? या दिवशी भगवान विष्णूंविनाच लक्ष्मीची एकटीची पूजा का केली जाते यामागची ही आहेत कारणं.

लक्ष्मीपूजनाला देवी लक्ष्मीबरोबर अनेक देवी देवतांची पूजा केली जाते. पण दिवाळीच्या या सगळ्यांत महत्त्वाच्या आणि प्रकाशमान रात्री श्रीहरींच्या पूजेची प्रथा नाही. यामागे एक विशेष कारण आहे. दिवाळीचा सण चातुर्मासात येतो. या दिवसांमध्ये श्रीविष्णू योगनिद्रेत असतात, असं मानलं जातं. त्यामुळेच कोणत्याही धार्मिक कार्यात ते अनुपस्थित असणं स्वाभाविक आहे. याच कारणामुळे लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी विष्णुंशिवाय एकटीच पृथ्वीवर येते असं मानलं जातं. त्यामुळेच लक्ष्मीपूजनाच्या रात्री एकट्या लक्ष्मीची विष्णूशिवायच अन्य देवतांसह घरोघरी पूजा केली जाते.
देवदिवाळीला भगवान विष्णूंचं आगमन

दिवाळीनंतर कार्तिक पौर्णिमेला भगवान विष्णू त्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात अशी श्रद्धा आहे. भगवान विष्णू चातुर्मासाच्या संपूर्ण काळात योगनिद्रेत असतात आणि ते दिवाळीनंतरच्या एकादशीला जागे होतात असं मानलं जातं. दिवाळी चातुर्मासात येत असल्यानं त्यांची निद्रा मोडू नये यासाठी लक्ष्मीपूजनाला त्यांना आवाहन केलं जात नाही किंवा त्यांची पूजाही केली जात नाही.

कार्तिक पौर्णिमेला जेव्हा भगवान विष्णू आपल्या योगनिद्रेतून जागे होतात त्या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी अनेक मंदिरांमध्ये आकर्षक सजावट केली जाते आणि धार्मिक कार्यक्रमही होतात.

दिवाळीला अनन्यसाधारण महत्त्व असल्यानेच या सणाला अनेक जण आपल्या मूळ गावी किंवा मूळ घरी जातात. नवे कपडे घालतात. फटाके उडवतात. किल्ला करतात. पती-पत्नीचा दिवाळी पाडवा साजरा होतो. भाऊ-बहिणीची भाऊबीज साजरी केली जाते. या सगळ्यांतून नाती दृढ होते आणि माणुसकीही दृढ होते. म्हणूनच दिवाळी ही केवळी पूजेची नाही तर ती भेटीगाठींचीही लयलूट करणारी असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *