दिवाळीत ऑनलाइन खरेदी करताना सावधान रहा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ ऑक्टोबर । दिवाळी सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावार ऑनलाईन खरेदी होत असल्याने सायबर भामटे देखील सक्रीय झाले आहे. ऑनलाईन खरेदी करणार्या नागरिकांची विविध प्रकारे फसवणूक केली जात आहे. यासाठी नागरिकांना सावधगिरीच्या सुचना.

दिवाळी हा भारतीयांचा सर्वात मोठा सण. या सणात मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. सध्या स्मार्ट डिजिटल युगात ऑनलाईन खरेदीकडे लोकांचा कल असतो. घरबसल्या लोकं ऑर्डर करून खरेदी करत असतात. ऑनलाईन पैसे भरण्याच्या अनेक सुविधा उपलब्ध झाल्याने ऑनलाईन खरेदी वाढली आहे. त्यामुळे सायबर भामटे या काळात सक्रीय झाले आहेत. ते ऑनलाईन शॉंपिग करणार्यांची फसणवूक करत असतात. अशा अनेक घटना वाढल्या असल्याने पोलिसांनी नागिरकांसाठी सावधगिरीच्या सूचना देत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. क्रेडीट कार्डने ऑनलाईन खरेदी करा परंतु गिफ्ट कार्ड मनी ट्रान्सफर्र किंवा क्रिप्टोकरन्सीद्वारे -पेमेंट स्विकारणाऱ्या ऑनलाईन विक्रेत्यांकडून काळजीपूर्वक व्यवहार करा ते बनावट असु शकतात, कोणत्याही नविन वेबसाईटवरून खरेदी करण्यापूर्वी त्याबद्दल संपूर्ण माहीती गोळा करा, डेबिट कार्डासह ऑनलाईन शॉपींग टाळा . जर तुमच्या कार्डमध्ये छेडछाड (क्र्लोंनग) झाली असेल तर पैसे थेट तुमच्या बँक खात्यातून घेतले जातात. त्यामुळे तुम्हाला मोठी हानी होण्याचा धोका संभवतो,

ऑनलाईन शाँपिग करीत असताना नेहमी सुरक्षीत संकेतस्थळाचा वापर करावा, पासवर्ड ठरविक वेळेने बदलत रहाणे. एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप माध्यमाद्वारे आलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन खरेदी करणे टाळणे, तसेच थेट बँक खात्याऐवजी क्रेडीट कार्ड अथवा वॉलेटचा वापर करावा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *