IPL 2022: मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला वगळणार! ‘या’ 3 खेळाडूंना देणार पसंती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ ऑक्टोबर । आयपीएल स्पर्धेच्या पुढील सिझनपूर्वी (IPL 2022) मेगा ऑक्शन होणार आहे. पुढील सिझनपूर्वी होणाऱ्या या ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या टीम सहभागी होणार आहेत. त्यामुळे बड्या खेळाडूंच्या खरेदीसाठी 10 टीममध्ये जोरदार चुरस होईल. पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सनं या पुढील सिझनसाठी रिटेन करणाऱ्या खेळाडूंची यादी तयार केली आहे. यामध्ये टीम इंडियाचा ऑल राऊंडर हर्दिक पांड्याचा (Hardik Pandya) समावेश नाही.

आयपीएलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, ‘बीसीसीआयकडं एक राईट टू मॅच (RTM) फॉर्म्युला असेल. आरटीएमला परवानगी देण्यात आली नाही तर आयपीएल टीमना 4 खेळाडू रिटेन करण्याची सूट मिळू शकते. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) हे खेळाडू मुंबई इंडियन्सची पहिली पसंत असतील. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर कायरन पोलार्डला (Kieron Pollard) देखील मुंबई रिटेन करेल. हे तीन खेळाडू मुंबईचे स्तंभ आहेत. त्यांच्यामुळेच या टीमनं सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये हार्दिकला मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये कायम ठेवण्याची शक्यता 10 टक्क्याहूनही कमी आहे. त्यानं टी20 वर्ल्ड कपमधील उर्वरित मॅचमध्ये चांगली कामगिरी केली तरीही तो टीममध्ये राहण्याची शक्यता कमी आहे. 4 खेळाडू रिटेन करण्याची किंवा आरटीएम वापरण्याची परवानगी मिळाली तर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) किंवा इशान किशन (Ishan Kishan) या जागेचे प्रबळ दावेदार असतील.’

हार्दिक पांड्याकडं एकहाती मॅच जिंकून देण्याची क्षमता आहे. पण गेल्या काही महिन्यात खराब फिटनेसचा परिणाम त्याच्या खेळावरही झाला आहे. आयपीएल स्पर्धेतील यूएई लीगमध्ये बॉलिंग केली नाही. त्यामुळे त्याच्या टीममधील जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *