Diwali आधीच Tata Motors चा धमाका ! एकाच दिवसात इतक्या नवीन वाहनांची एंट्री

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ ऑक्टोबर । दिवाळीआधीच (Diwali 2021) टाटा मोटर्सने जबरदस्त धमाका घडवून आणला आहे. टाटा मोटर्सने गुरुवारी एकाच दिवसात 21 नवीन कमर्शिअल वाहनांचे अनावरण (Tata Motors unveils 21 Commercial Vehicles) केले आहे. टाटा मोटर्सने ट्वीट करुनही याबाबत माहिती दिली आहे. या वाहनांमध्ये ट्रान्सपोर्टेशनची गरज भागवण्यासाठी आवश्यक कार्गोसहित विविध वाहनांचा समावेश आहे.

कोणत्या सेगमेंटमधील वाहनांचे अनावरण?

>> मिडियम आणि हेवी कमर्शियल व्हेइकल (M&HCV) सेगमेंटमध्ये सात प्रोडक्ट

>> सीएनजी पॉवरट्रेनसह इंटरमिडियेट आणि लाइट कमर्शियल व्हेइकल (4-18 tonne GVW) सेगमेंटमध्ये पाच प्रोडक्ट्स

>> टाटा मोटर्सने दुर्गम भागात वितरण सुधारण्यासाठी (Distribution in rural area) आणि परिचालन खर्च कमी करण्यासाठी चार नवीन LCV (लाइट कमर्शिअल व्हेइकल) सादर केले. यामध्ये पेट्रोल इंजिनसह Ace आणि ई-कॉमर्स वितरणाच्या वाढत्या गरजांसाठी विंगर कार्गोचा समावेश आहे.

हे वाचा- गाडी विकल्यानंतर FASTag चं काय करायचं? जाणून घ्या

>> टाटा मोटर्सने शहरांतर्गत वाहतुकीच्या बसेससह पाच व्यावसायिक वाहनेही सादर केली आहेत.

We’re thrilled to announce the unveil of 21 new vehicles, a historic moment for us & a redefining one for our customers. Bigger, better & more profitable CV across categories, to drive your business in the direction of success. Join us at 5 pm today. #TataMotorsBS6Trucks pic.twitter.com/uTJ2jtc44z

— Tata Motors (@TataMotors) October 28, 2021
कार्यकारी संचालकांनी दिली अशी माहिती

कंपनीचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले की, व्यावसायिक वाहन विभागातील अग्रणी म्हणून टाटा मोटर्स ग्राहकांना उत्कृष्ट आणि भविष्यकालीन उत्पादने तसंच सेवा प्रदान करून उत्तम मूल्य प्रदान करत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *