Boondi Laddu : स्वादिष्ट बुंदी लाडू कसे कराल?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ ऑक्टोबर । सणासुदीचे दिवस सुरू झाले की, स्पेशल रेसिपी बनवणं हा एक रिवाज आहे. प्रत्येक सणाची काही स्पेशल रेसिपी असते. त्यात दिवाळी हा महत्वाचा सण आहे. कारण, या सणामध्ये अनेक रेसिपी असतात. लाडू (Boondi Laddu), चिवडा, करंजी, चकली, शंकरपाळी, कापण्या, शेव, अनारसे, बाकरवडीस मुगाच्या डाळीचे लाडू अशा अनेक रेसिपींची मेजवाणीच असते. दिवाळीच्या सणानिमित्त आपण काही स्पेशल रेसिपी पाहणार आहोत. त्यातील आज महाराष्ट्रातील खास ‘बुंदी लाडू’ रेसिपी पाहूया…

१) एक कप बेसन

२) एक कप साखर

३) वेलची पावडर

४) तेल किंवा तूप

५) बुंदी पाडण्यासाठी आणि तळण्यासाठी झारे

Boondi Laddu
कृती

१) बेसनमध्ये १ चमचा तूप घाला. थोडं-थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्या. लक्षात ठेवा पीठ हे मध्यम भिजवा, जेणेकरून पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत. घट्ट आणि पातळदेखील होता कामा नये.

२) मध्यम गॅसवर कढई ठेवून त्यात तळण्यासाठी तेल घाला.

३) त्यानंतर कढईवर झारा धरून भिजवलेल्या पिठाची बुंदी पाडून घ्या. तळेलेले बुंदी एखाद्या पेपवर काढून घ्या.

४) साखरेमध्ये साखर बूडेल इतके पाणी घाला आणि त्यात पाक बनवून घ्या. पाकात वेलची पावडर आणि केशर घाला.

५) त्यानंतर सर्व बुंदी पाकात ढवळून घ्या. पाक शोषून घेतला की, लाडू बांधून घ्या. अशाप्रकारे बुंदीचे लाडू (Boondi Laddu) तयार झाले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *