1 एप्रिलपासून मिळणारे BSVI पेट्रोल, डिझेल…नेमके काय आहे

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24- मुंबई
देशात वाढत्या प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल 2020 पासून BS6 एमिशन स्टेंडर्ड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रामुख्याने तेल उत्पादन कंपन्यांनी देखिल बीएस6 करता रिफाइनरीजना अपडेट करण्याच्या तयारीत आहेत. साधारणपणे ज्या इंधनामध्ये सल्फरचं प्रमाण कमी असेल ते इंधन अधिक साफ आणि कमी प्रदूषण करणारे असते. सल्फर कमी असल्यामुळे उत्सर्जित होणार NOx आणि कार्बन मोनाऑक्साईड CO आणि हाइड्रोकार्बनचं प्रमाण देखील कमी होईल. बीएस6 इंधनावर चालणाऱ्या डिझेल, पेट्रोल इंजिनाच्या कार तयार करताना थोडा बदल करण्यात येणार आहे. नव्या गाड्यांना सुरूवातीला CNG च्या आधारावरच तयार करण्यात येणार आहे. अनेक मोठ्या कंपन्या आता इलेक्ट्रिक आणि हाइब्रिड गाड्यांवर अधिक भर लक्ष देण्यात आलं आहे.

इंधन बनवणाऱ्या तेल रिफायनरी कंपन्यांना आपली रिफायनरी अपग्रेड करावी लागली. या अपग्रेडेशनवर होणार खर्च सामान्य ग्राहकांकडून वसून करण्यात येणार आहे. यासंबंधीत काही प्रमुख कंपन्यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्या प्रमाणे इंधनांच्या किंमतीत फार कमी वाढ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *