IRCTC च्या निर्णयावर रेल्वे मंत्रालयाचा यु-टर्न; २५ टक्क्यांपर्यंत Shares घसरल्यानंतर आता रिकव्हरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ ऑक्टोबर । IRCTC Share Price: शुक्रवारी कामकाजाच्या दरम्यान IRCTC चे शेअर्स (IRCTC Shares) जबरदस्त आपटले होते. कामकाजाच्या सुरूवातीच्या टप्प्यात आयआरसीटीसीच्या शेअर्सला लोअर सर्किटही लागलं होतं. सरकारनं कंपनीला आपल्या बेवसाईटवरून येणाऱ्या सेवा शुल्काच्या रूपात येणाऱ्या महसूलातील ५० टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आयआरसीटीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घरसण दिसून आली होती. परंतु शुक्रवारी रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर शेअर्समध्ये पुन्हा वाढ झाली.

दीपम (DIPAM) च्या सचिवांनी यासंदर्भात एक ट्वीट करत माहिती दिली. “रेल्वे मंत्रालयानं आयआरसीटीसीच्या सेवा शुल्कावरील निर्णय मागे घेण्याची घोषणा केली आहे,” असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं. गुरूवारी Stock Split नंतर १० टक्क्यांपेक्षा अधिक वर गेलेला आयआरसीटीसीचा शेअर शुक्रवारी सकाळी कामकाजादरम्यान २५ टक्क्यांपर्यंत खाली आला. आयआरसीटीच्या शेअरला ६८५.१५ रूपयांचं लोअर सर्किटही लागलं होतं.

का आपटले IRCTC चे शेअर्स?
सरकारनं भारतीय रेल्वेच्या ऑनलाइन शाखेला आपल्या इंटरनेट बुकिंगच्या सेवा शुल्काचा अर्धा हिस्सा शेअर करण्याचे निर्देश दिले होते. आयआरसीटीला रेल्वे मंत्रालयासोबत आपल्या वेबसाईटवरून येणाऱ्या बुकिंगमधून सेवा शुल्काच्या स्वरूपात मिळणाऱ्या महसूलाचा ५० टक्के सेवा शुल्काच्या रूपात शेअर करण्यास सांगण्यात आलं होतं. ही प्रक्रिया कोरोना महासाथीनंतर बंद करण्यात आली होती. परंतु हे माहिती समोर येताच आयआरसीटीसीचे शेअर्स आपटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *