महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑक्टोबर । क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अडकलेला आर्यन खान अखेर २७ दिवसांनंतर आज तुरुंगातून बाहेर येईल आणि मन्नत म्हणजेच त्याच्या घरात प्रवेश करेल. आर्थर रोड जेलची जामीन पेटी आज पहाटे 5.30 वाजता उघडण्यात आली, त्यानंतर आर्यनच्या जामिनाची कागदपत्रे तुरुंगात पोहोचली आहेत. जेल उघडण्याची वेळ सकाळी 10 ची असून सकाळी 10.30 ते 11 या वेळेत आर्यन तुरुंगातून बाहेर येऊ शकतो अशी माहिती मिळाली आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की शाहरुख खान आणि आर्यन खानची कायदेशीर टीम आर्थर रोड जेलमध्ये पोहोचली आहे.
शुक्रवारी सायंकाळी उशिरा त्याचा जामीन आदेश कारागृहाच्या जामीन पेटीत पोहोचला होता, मात्र सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत तो तुरुंग अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. वकील सतीश मानशिंदे हे स्वत: सत्र न्यायालयातून जामिनाची कागदपत्रे घेऊन आर्थर रोड कारागृहाकडे रवाना झाले होते, मात्र त्यांना पोहोचण्यास उशीर झाला. यापूर्वी अभिनेत्री जुही चावलाने सत्र न्यायालयात पोहोचल्यानंतर आर्यनच्या जामीनपत्रावर स्वाक्षरी केली होती.
आर्यन कित्येक तास जेलच्या ऑफिसमध्ये बसून होता
तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुटकेच्या प्रतीक्षेत असलेला आर्यन दुपारपासून तुरुंगाधिकारी कार्यालयात सामान घेऊन बसला होता, मात्र संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्याच्या सुटकेची कोणतीही घोषणा न झाल्याने तो निराश होऊन आपल्या बॅरेकमध्ये परतला.
जामिनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे आर्यनला शुक्रवारची रात्र आर्थर रोड कारागृहात काढावी लागली. तुरुंगातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत तुरुंगातून बाहेर येऊ शकतो. आर्यनची सुटका आर्थर रोड जेलच्या बेल बॉक्समध्ये किती रिलीझ ऑर्डर प्रलंबित आहे यावरही अवलंबून आहे. जर आधीच जास्त रिलीझ ऑर्डर असतील तर थोडा वेळ लागेल आणि जर कमी रिलीझ ऑर्डर असतील तर जास्त वेळ लागणार नाही.