महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑक्टोबर । ऑक्टोबर महिन्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. सोमवारपासून नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. या दरम्यान, असे अनेक बदल होत आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर होईल. पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून (Rules changing from 1st November) देशभरात अनेक मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि आयुष्यावर होईल (Changes from 1 november) म्हणूनच नियमांची माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. या बदल होणाऱ्या नियमांमध्ये बँकांमध्ये पैसे जमा करण्यापासून ते पैसे काढण्यापर्यंत शुल्क आकारण्याच्या नियमांचा समावेश आहे. त्याचबरोबर रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल होणार आहे. याशिवाय गॅस सिलेंडर बुकिंगच्या नियमांमध्येही बदल होणार आहे. जाणून घ्या महत्त्वाचे 5 बदल
1. एलपीजी सिलेंडरची किंमत
1 नोव्हेंबरपासून एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो. दरम्यान नोव्हेंबर महिन्यात LPG च्या किमती वाढवल्या जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एलपीजीच्या विक्रीतील तोटा पाहता सरकार पुन्हा एकदा एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढवू शकते.
2. बँकिंग नियमांमध्ये बदल
आता बँकांना पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. बँक ऑफ बडोदा (BoB) ने याची सुरुवात केली आहे. पुढील महिन्यापासून निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त बँकिंग केल्यास वेगळे शुल्क आकारले जाईल. 1 नोव्हेंबरपासून ग्राहकांना कर्ज खात्यासाठी 150 रुपये भरावे लागणार आहेत. खातेधारकांसाठी तीन वेळा ठेवी विनामूल्य असतील, परंतु ग्राहकांनी चौथ्यांदा पैसे जमा केल्यास त्यांना 40 रुपये द्यावे लागतील. दुसरीकडे, जन धन खातेधारकांना यात काहीसा दिलासा मिळाला असून, त्यांना डिपॉझिटवर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, परंतु पैसे काढल्यावर 100 रुपये द्यावे लागतील.
3. रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलेल
भारतीय रेल्वे देशभरातील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करणार आहे. याआधी 1 ऑक्टोबरपासून गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार होता, मात्र काही कारणांमुळे 31 ऑक्टोबरपर्यंत हा निर्णय पुढे ढकलण्यात आला. आता 1 नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. यानंतर, 13 हजार पॅसेंजर गाड्या आणि 7 हजार मालगाड्यांच्या वेळा बदलतील. देशात धावणाऱ्या सुमारे 30 राजधानी गाड्यांच्या वेळाही 1 नोव्हेंबरपासून बदलणार आहेत.
4. गॅस सिलेंडरच्या बुकिंगसाठी द्यावा लागणार OTP
1 नोव्हेंबरपासून एलपीजी सिलेंडर डिलिव्हरीची प्रक्रिया बदलणार आहे. गॅस बुक केल्यानंतर ग्राहकांच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. जेव्हा सिलेंडर डिलिव्हरीसाठी येतो तेव्हा तुम्हाला हा OTP डिलिव्हरी बॉयसोबत शेअर करावा लागेल. हा कोड सिस्टीमशी जुळल्यानंतर ग्राहकाला फक्त सिलेंडरची डिलिव्हरी मिळेल.
5. Whatsapp बंद होईल
1 नोव्हेंबरपासून व्हॉट्सअॅप काही आयफोन आणि अँड्रॉईड फोनवर काम करणे बंद करणार आहे. WhatsApp वर दिलेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबरपासून फेसबुकच्या मालकीचा हा प्लॅटफॉर्म Android 4.0.3 Ice Cream Sandwich, iOS 9 आणि KaiOS 2.5.0 ला सपोर्ट करणार नाही.