महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑक्टोबर । सकाळी पुण्यातून (Pune) एका दुर्घटनेची माहिती समोर येत आहे. बालेवाडीतील पाटील नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या (construction site) ठिकाणी (slab) स्लॅब (Pune Building Collapse)कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही जण जखमी झाल्याची आणि अडकून पडल्याची माहिती समोर येत आहे.
या दुर्घटनेत 6 ते 8 लोक जखमी आहेत. जखमींना वाकड येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सुदैवानं या दुर्घटनेत कोणी गंभीर जखमी झालेलं नाही.
पुणे पालिकेनं या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. पालिकेनं ट्विटमध्ये म्हटलं की, बालेवाडी, पाटील नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. काही जण जखमी किंवा अडकल्याची प्राथमिक माहिती असून पुणे, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या 6 फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.