Petrol Diesel Price: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल पाच, डिझेल दहा रुपयांनी स्वस्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ नोव्हेबर । इंधनदराच्या भडक्यामुळे त्रासलेल्या नागरिकांना केंद्र सरकारने बुधवारी काही प्रमाणात दिलासा दिला. केंद्राने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये, तर डिझेलवरील शुल्कात दहा रुपये कपात केली असून, ती आज गुरुवारपासून लागू होईल.

गेल्या काही महिन्यांपासून इंधनदरात झपाट्याने वाढ होत असून, मुंबईत पेट्रोल ११५.८५ रुपयांवर पोहोचले. दिल्लीतही पेट्रोलदराने ११० रुपयांचा टप्पा ओलांडला. देशातील जवळपास सर्व मोठ्या शहरांत पेट्रोलने शंभरी ओलांडली असून, डिझेलनेही नवा उच्चांक गाठला.

इंधन दरवाढीमुळे इतर वस्तूंचीही भाववाढ झाल्याने ऐन सणासुदीत ग्राहकांना महागाईस सामोरे जावे लागत आहे. त्यावरून कॉंगे्रससह विरोधकांनी केंद्रातील भाजप सरकारला सातत्याने लक्ष्य केले. लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत काही ठिकाणी सत्ताधारी भाजपला पराभवाचा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर अखेर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पेट्रोलदरात पाच रुपयांची, तर डिझेलदरात दहा रुपयांची कपात होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *