दिवाळीत Good News, ‘या’ सिंगल लसीचा डोस करतोय Coronaचा धोबीपछाड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ नोव्हेबर । कोरोना व्हायरसला (Coronavirus in India)रोखण्यासाठी लस खूप महत्त्वाचं काम करत आहे. भारतात सध्या लसीकरणावर जास्त भर दिला जात आहे. त्यातच भारतातील कोरोना व्हायरसने प्रभावित झालेल्या लोकांवर रशियाची एक डोस स्पुतनिक लाइट लस (Sputnik Light Vaccine)जास्त सुरक्षित आणि चांगली प्रतिकारशक्ती देणारी असल्याचं सिद्ध झालं आहे. लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल्सच्या निकालांमध्ये ही बाब समोर आली आहे.

गेल्या वर्षी लाँच केलेल्या दोन-डोस स्पुतनिक V लसीचे सौम्य स्वरूप असल्याचं मानली जात आहे ही सिंगल-डोस लस, जी आधीच अभ्यासाच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे आणि रशियामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. रशिया स्पुतनिक लाइट लस निर्यातीसाठी त्याची मुख्य लस बनवण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे.

सेंट पीटर्सबर्ग येथील लस निर्माता गामालेया संस्थेतील शास्त्रज्ञ 18-59 वयोगटातील 110 स्वयंसेवकांच्या इम्यून सिस्टम आणि महत्त्वपूर्ण साईड इफेक्ट्सवर लक्ष ठेवत आहेत. जानेवारी 2021 मध्ये त्यांचं लसीकरण करण्यात आलं. परिणामांमध्ये असे आढळून आले की ते कोरोन व्हायरसच्या मूळ प्रकारावर वेगाने कार्य करते, मात्र महामारीच्या अल्फा आणि बीटा आवृत्त्यांवर काम करण्याची गती थोडी मंद आहे. रशियामध्ये कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटचे नवीन प्रकरणे आणखीन समोर येत आहेत.

रशियानं आधीच सांगितलं आहे की संशोधनात असे आढळून आले आहे की स्पुतनिक लाइट लस लसीकरणानंतर तीन महिन्यांपासून डेल्टा व्हेरिएंटवर 70 टक्के प्रभाव दर्शवते. अभ्यासात असे म्हटले आहे की स्पुतनिक लाइट केवळ प्राथमिक लसीसाठीच नाही तर पहिल्या कोविड-19 संसर्गानंतर लसीकरणासाठी देखील प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.

द लॅन्सेट आणि गामालेया मधील 6,000 सहभागींसह आंतरराष्ट्रीय आणि प्लेसबो-नियंत्रित फेज III अभ्यासाच्या प्रकाशित चाचण्यांच्या निकालांवर आधारित, स्पुतनिक लाइटला 6 मे रोजी रशियामध्ये क्लिनिकल वापरासाठी मंजूर करण्यात आले.
भारताने 10 ऑक्टोबर रोजी अँटी-कोविड-19 लस स्पुतनिक लाइटच्या निर्यातीला परवानगी दिली. स्पुतनिक लाइट या अँटी-कोविड-19 लसीच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. स्पुतनिक लाइट हे रशियन लस स्पुतनिक V च्या घटक-1 सारखे आहे. भारताच्या औषध नियामकाने एप्रिलमध्ये Sputnik V च्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली, ज्याचा वापर भारताच्या COVID-19 विरोधी लसीकरण कार्यक्रमात केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *