महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ नोव्हेबर । सणासुदीमध्ये पहिला परिणाम आपल्या रोजच्या जेवणावर होतो. दररोज तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याबाबत किंवा डाएटिंगबाबत सर्तक असाल पण सणासुदीच्या वेळी डाएटिंगला ब्रेक लागतो. इतके स्वादिष्ट आणि विविध प्रकारचे पदार्थ आपल्या समोर असतात की आपण ते खाल्ल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर आरोग्याच्या अनेक समस्याही उद्भवू लागतात. सुंदर कपडे घालून दिवाळी साजरी करा, पण तुमच्या खाण्यापिण्यावर थोडे नियंत्रण ठेवा.
जास्त खाल्ल्याने शरीरात गॅसची समस्या होऊ शकते. सण-उत्सवांचे जेवण हे खूप तेलकट-मसालेदार असते. तेल आणि मसाले जास्त खाल्ल्याने पोटात गॅस होऊ शकतो. काही वेळा जड अन्न आतड्यात अनेक दिवस अडकून राहते आणि त्यामुळे बद्धकोष्ठता निर्माण होते.
सणासुदीच्या काळात भरपूर खाल्ल्याने वजन वाढल्याची तक्रार लोक अनेकदा करतात. हे वजन खरं तर शरीराच्या आत होणारी जळजळ असते. म्हणजेच तुमचे शरीर आतून फुगते. तुम्हाला अनेकदा असे वाटले असेल की सकाळी उठल्यावर पोट फुगते. असे घडते कारण शरीराच्या आत जळजळ होत आहे.
जास्त खाल्ल्याने अपचन आणि बद्धकोष्ठता दोन्ही होऊ शकतात. जास्त तेल आणि मसालेदार अन्न पोटात सहज पचत नाही. यासोबतच मैदा आणि कार्ब्स असलेल्या अनेक गोष्टी आपल्या आतड्यांमध्ये चिकटून राहतात आणि बद्धकोष्ठता निर्माण होते. या दोन्ही समस्या अति खाण्यामुळे होतात. संतुलित आणि काळजीपूर्वक खाल्ल्यास या सर्व समस्या टाळता येतात.