महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ नोव्हेबर । २५ ऑक्टोबरला देशातून यंदा मान्सुनने माघार घेतली असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर केले होते. दरम्यान, श्रीलंका आणि तमिळनाडू किनाऱ्यालगतच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने पश्चिम किनारपट्टीवर पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे ४ ते १० नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील काही भागात पाऊस पडेल असा अंदाज आहे.
पुन्हा पुढील २ ते ३ दिवस राज्यात विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. येत्या ५ दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशाराही प्रादेशिक हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात गेले दोन ते तीन दिवसात हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. यात कोकणाचा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रदेशांचा समावेश आहे. या प्रदेशातील काही ठिकाणी गेली ४ दिवस मेघगर्जनेसह ४ पाऊस सुरू आहे. ऐन दिवाळीत ढगाळ वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांची भातकापणीसाठी धांदल उडाली आहे. या अंदाजानुसार राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी सुरू आहेत.