मंगळ ग्रहावरावरील दृष्याने नासाही झाली हैराण

Spread the love

महाराष्ट्र 24 -मुंबई
अमेरिकेची अंतराळ संशोधन मोहिम संस्था नॅशनल अॅरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन नासा (NASA) ने मंगळ ग्रहावरील 2011 मध्ये घेतलेला फोटो प्रसिद्ध केला आहे. या फोटोमध्ये एक रहस्यमयी खड्डा दिसत आहे. Independent ने दिलेल्या वृत्तानुसार, शास्त्रांचं म्हणणं आहे की, या खड्ड्यामुळे मंगळ ग्रहावर जीवन सृष्टी असल्याचा काही पुरावा हाती लागू शकतो. जवळपास 35 मीटर रूंद असलेल्या खड्ड्याभोवती काही गुफा असल्याचं समोर आलं आहे. या फोटोवर शास्त्रांनी अजून खोलात जाऊन संशोधन केलं नाही.

दरम्यान, नासात इंटर्नशीप करणाऱ्या एका विद्यार्थानं मोठा शोध लावलाय. त्यानं चक्क एका नव्या ग्रहाचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे, या ग्रहात दोन सूर्य आहे. या नव्या ग्रहाचं नाव T0I 1388B ठेवण्यात आलंय. या नव्या ग्रहाचा आकार नेप्च्युन आणि सॅटर्न ग्रहा एवढा असल्याची माहिती नासाकडून देण्यात आली आहे. नव्या ग्रहाचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे हा ग्रह दोन ताऱ्यांची परिक्रमा करतो.

नासाने काही दिवसांपूर्वी एक रोबोट पाठवला होता. याचं नाव होतं ऑर्बिटर. हा रोबोट सतत मंगळग्रहावरील फोटो कॅमेऱ्यात कैद करत होता आणि तो नासाला पाठवत होता. हा फोटो सुद्धा ऑर्बिटरने पाठवला आहे. जेव्हा या खड्डाबद्दल माहिती मिळाली तेव्हा नासाच्या शास्त्रांनी असा अंदाज व्यक्त केला ही गुफा जवळपास 20 मीटर खोल आहे.

नासाने आपल्या एका ब्लॉगमध्ये स्पष्ट केलं आहे की, या गोलाकार खड्ड्याभोवती अनेक सुरक्षित गुफा असल्याचं कळतंय. याची लांबी 35 मीटर आणि खोली 20 मीटर पर्यंत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शास्त्र आणि अभ्यासक याबद्दल सखोल अभ्यास करत असून आणखी नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *