महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ नोव्हेबर । तब्बल 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान (PAK vs AUS) दौऱ्यावर जाणार आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये 3 टेस्ट आणि 3 वनडे सीरीजसह टी20 मॅच खेळवण्यात येणार आहे. नियोजनानुसार, ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील वर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यात पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. मात्र, ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) जाण्यास नकार दिला आहे.
क्रिकेट जगतात सुरु असलेल्या चर्चेनुसार, ग्लेन मैक्सवेलचा पाकिस्तान दौरा अद्याप निश्चित नाही. कारण, गेल्या वर्षी मार्चमध्ये त्याने भारतीय वंशाच्या मुलीशी साखरपुडा उरकला होता. आता दोघेही पुढच्या वर्षी लग्न करणार आहेत. त्यामुळे तो पाकिस्तान दौऱ्यावर जाऊ शकणार नाही.
ग्लेन मॅक्सवेल या संदर्भात म्हणाला की, ‘मला वाटते की आम्हाला पाकिस्तान दौऱ्यावर परत जाण्याची संधी मिळाली हे खूप चांगले आहे. कदाचित आम्ही शेवटचे 1998 मध्ये तिथे गेलो होतो. मी या दौऱ्यावर जात आहे की नाही हे कदाचित माझ्या होणाऱ्या बायकोवर अवलंबून असेल. कारण त्या काळात मला लग्न करायचे आहे.
दरम्यान, तुम्ही लग्नाची डेट चेंज करु शकता का? असे विचारले असता तो म्हणाला, नाही. आम्ही तसे करु शकत नाही. कारण दोनदा आम्ही आमच्या लग्नाची तारीख चेंज केली आहे. त्यामुळे हे लग्न पुढच्या वर्षीच होईल असं मला वाटतं.
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwel) लवकरच भारताचा जावई होणार आहे. मॅक्सवेलची भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमन (Vini Raman) हिनं याबाबत खुलासा केला आहे.
मागील महिन्यात मॅक्सवेलचा वाढदिवस झाला. त्या दिवशी विनीनं इन्स्टाग्राम स्टोरीतून दोघे लग्नबंधनात कधी अडकणार आहेत हे सांगितले होते. . ‘मॅक्सवेल वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुझ्याशी लग्न करण्यासाठी आणखी वाट पाहू श, कत नाही, 2022 हे आपलं वर्ष असेल,’ असं विनीनं स्टोरीमध्ये म्हटलं होत.
मॅक्सवेल आणि विनी बराच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 साली मॅक्सवेलनं मानसिक कारणामुळे क्रिकेटपासून ब्रेक घेतला होता. त्यावेळी विनीनं त्याला वाईट कालखंडातून बाहेर काढलं असा खुलासा मॅक्सवेलनंच केला होता. (इन्स्टाग्राम)
यूएईमध्ये सुरू असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सेमीफायनल सामना 12 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.