सोने खरेदी ; सराफाकडून मिळणाऱ्या पावतीमध्ये तपासा या गोष्टी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० नोव्हेबर । दिवाळीनिमित्त सध्या सोने खरेदीचा हंगाम सुरू आहे. तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर काही महत्त्वाच्या गोष्टींचा नक्कीच विचार करा. तुम्ही जे दागिने किंवा सोन्याची एखादी वस्तू खरेदी करत आहात, तर त्यावरील हॉलमार्किंग नक्कीच तपासा. ही पहिली पायरी आहे, जी तुमची खरेदी योग्य असल्याची खात्री करते आणि तुम्ही योग्य ठिकाणी पैसे भरत आहात. दुसरी गोष्ट बिलाची. बिलाशिवाय कोणतीही खरेदी करू नका, कारण नंतर तोच दुकानदार तुम्ही त्याच्याकडून वस्तू घेतल्याचे नाकारू शकतो. बिल घेण्याचा फायदा असा आहे की, जेव्हा तुम्ही ते विकायला जाल, तेव्हा तुमचाच त्रास वाचेल.

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) नुसार, जर तुम्ही किरकोळ विक्रेत्याकडून किंवा ज्वेलर्सकडून हॉलमार्क केलेले दागिने विकत घेत असाल, तर त्याच्याकडून प्रमाणित बिल किंवा इनव्हॉइस घेणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचे वाद, गैरवापर किंवा तक्रार निवारणासाठी हे आवश्यक आहे. त्यामुळे हॉलमार्क केलेल्या दागिन्यांचे बिल कसे असावे आणि त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश असणे आवश्यक आहे, हे थोडक्यात जाणून घेऊया.

बीआयएस (BIS)चे निर्देश काय आहेत?
बीआयएस (BIS)च्या वेबसाइटनुसार, ज्वेलर्स किंवा किरकोळ विक्रेत्याकडून प्राप्त झालेल्या बिल / इनव्हॉइसमध्ये हॉलमार्क केलेल्या वस्तूंचा तपशील असणे आवश्यक आहे. धातूच्या विक्रीच्या बिलामध्ये प्रत्येक वस्तूचे वर्णन, मौल्यवान धातूचे निव्वळ वजन, कॅरेट, शुद्धता आणि हॉलमार्किंग शुल्क नमूद केलेले असावे. तसेच ग्राहक हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता किंवा बीआयएसद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही ए अँड एच केंद्रातून दागिन्यांची तपासणी करून घेऊ शकतो,” हे देखील लिहिलेले असायला पाहिजे.

हे टाळा
अनेक दुकानदार ग्राहकांना तात्पुरती बिले देतात. पण या बिलामध्ये सर्वच गोष्टींची नोंद नसते. तात्पुरत्या बिलामध्ये फक्त ज्वेलरी स्टोअरचे नाव (ज्यामधून दागिने खरेदी केले आहेत) आणि तुम्ही खरेदी केलेल्या दागिन्यांचे नाव दर्शवते. हे बिल सहसा कोऱ्या कागदावर बनवले जाते. अशा व्यवहारातून काळा पैसा निर्माण होतो.

दुसरीकडे, स्थायी बिल पूर्णपणे वैध व्यवहारांवर आधारित असते.

– खरेदी केलेल्या सोन्याची शुद्धता
– दागिन्यांचे नाव आणि कोड
– तुम्ही ज्या सोन्यासाठी पैसे देत आहात त्याचे मेकिंग आणि वेस्टेज चार्जसारखे अतिरिक्त शुल्क
– ज्वेलर्सचा जीएसटी (GST) ओळख क्रमांक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *