Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
पहिल्या कसोटीसाठी 16-सदस्यीय टीम घोषित:अजिंक्य रहाणे कर्णधार - Maharashtra 24

पहिल्या कसोटीसाठी 16-सदस्यीय टीम घोषित:अजिंक्य रहाणे कर्णधार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ नोव्हेबर । 17 नोव्हेंबरपासून भारतीय संघ न्यूझीलंडशी घरच्या मैदानावर खेळणार आहे. यादरम्यान दोन्ही संघ तीन टी-20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली संघाचा भाग नाहीत. अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर चेतेश्वर पुजाराला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्यात संघात सामील होईल आणि कर्णधारपदाची धुरा सांभाळेल.

संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद यादव, मोहम्मद यादव. प्रसिद्ध कृष्ण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *