Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
अनिल देशमुखांच्या ईडी कोठडीत १५ नोव्हेंबरपर्यंत वाढ - Maharashtra 24

अनिल देशमुखांच्या ईडी कोठडीत १५ नोव्हेंबरपर्यंत वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ नोव्हेबर । उच्च न्यायालयाच्या विशेष सुट्टीकालीन एकलपीठाने आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रविवारी रद्द केला होता. तसेच १२ नोव्हेंबपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी देशमुख यांना सुनावली. दरम्यान त्यांची आज कोठडी संपल्यामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये आता वाढ होत आहे.

१५ नोव्हेंबर पर्यंत ईडी कोठडीमध्ये अनिल देशममुखांना ठेवण्याचे निर्देश दिले गेले आहेत. अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरु होती. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. दरम्यान, त्यांची कोठडी संपल्यामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *