Coronaवर उपचारासाठी Nasal Spray, नाका-तोंडाद्वारे देणार डोस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ नोव्हेबर । Second Generation Vaccination : जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरस (Corona Virus) महामारीला आता जवळपास दोन वर्षे पूर्ण होत आहेत. पण त्याचा शेवट अद्याप निश्चित झालेला नाही. जगभरातील शास्त्रज्ञ या व्हायरसवर (Virus) औषध शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अद्यापपर्यंत इम्युनिटी वाढवणारी लस याशिवाय दुसरे काहीही सापडलेले नाही. आज या महामारीचा अंत दिसत नसताना आता शास्त्रज्ञांनी दुसऱ्या पिढीची (Second Generation) लस तयार करण्यावरही लक्ष केंद्रित केलं आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) चे मुख्य शास्त्रज्ञ डॉ सौम्या स्वामीनाथन (Dr Soumya Swaminathan) यांनी म्हटलं की, आता नेजल स्प्रे (Nasal Spray)आणि तोंडावाटे लस (Oral Version) तयार करण्यावर भर दिला जात आहे. म्हणजेच ती नाक आणि तोंडाद्वारे दिली जाणार आहे.

डॉ. सौम्या स्वामीनाथन (Dr Soumya Swaminathan) यांनी सांगितलं की, इन्फ्लुएंझा व्हॅक्सिन (Influenza Vaccine) नाकातून दिली जाते. अशा परिस्थितीत जेव्हा कोरोनाची लस नाकातून दिली जाते तेव्हा प्रथम नाकात अँटीबॉडीज (Antibodies) तयार होतील. यामुळे श्वासोच्छवासाद्वारे फुफ्फुसांपर्यंत व्हायरस पोहोचणं कठीण होईल. याचा परिणाम असा होईल की नाकाद्वारे लस घेणाऱ्यांच्या फुफ्फुसात व्हायरस पोहोचू शकणार नाही आणि त्यामुळे कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. अशा परिस्थितीत या प्रकारची लस अधिक प्रभावी ठरू शकते.

डॉ स्वामीनाथन (Dr Soumya Swaminathan) म्हणतात की, कोरोनाची कोणतीही लस 100% सुरक्षित आणि प्रभावी नाही आहे. कोणतीही लस कंपनी दावा करू शकत नाही की त्यांची लस 100% प्रभावी आहे. पण होय, ही लस शून्याच्या तुलनेत 90% प्रभावी आहे, त्यामुळे संसर्गापासून संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. यासोबतच त्या म्हणाल्या की, सध्या जी कोरोनाची लस घेतली जात आहे ती ठीक आहे, पण आपण त्यांचाही विचार केला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *