![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ नोव्हेबर । सिंधुदुर्गातील मालवण चिवला समुद्र किनाऱ्यावर चक्क डॉल्फिन मासे सापडले आहेत. यावेळी मच्छीमारांनी लावलेल्या जाळ्यात तब्बल 15 डॉल्फिन सापडल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी या डॉल्फिनला पाहाण्यासाठी गर्दी केली आहे.
सिंधुदुर्गातील मालवण चिवला समुद्र किनारा हा सफारी आणि डॉल्फिन दर्शनासाठी प्रसिध्द आहे. शुक्रवारी (12 नोव्हेंबर) या ठिकाणी पारंपारिक मच्छीमारांनी लावलेल्या रापण जाळीत चक्क डॉल्फिन मासे सापडले आहेत. जवळपास 15 हून अधिक डॉल्फिन मासे रापण जाळीत अडकल्याचे मच्छिमारांच्या निदर्शनास येताच सर्वांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. दरम्यान, हे डॉल्फिन पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.
