काटे की टक्कर ; जिवलग मित्र आज T20 World Cup च्या फायनलमध्ये आमने-सामने

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ नोव्हेबर । टी-20 वर्ल्डकप 2021 च्या फायनलमध्ये आज आपल्याला दोन बालपणीचे मित्र एकमेकांविरोधात खेळताना दिसतील. होय, आज जेव्हा दोन शेजारी देश म्हणजेच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया 2021 च्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भिडतील, तेव्हा या सामन्यात बालपणीचे दोन मित्रही आमनेसामने असतील. जे एकेकाळी शाळेत एकत्र क्रिकेट खेळायचे ते आज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. आम्ही बोलत आहोत न्यूझीलंडचा डॅरेल मिशेल (Daryl Mitchell) आणि ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉयनिसबद्दल (Marcus Stoinis). शालेय क्रिकेटमध्ये दोघेही एकत्र खेळायचे. पण नंतर चांगले क्रिकेटपटू बनण्याच्या इच्छेने त्यांचे मार्ग वेगळे झाले. (T20 World Cup Final: School Friends Daryl Mitchell and Marcus Stoinis will Face Off As Rivals)

ही गोष्ट 2009 सालची आहे. तेव्हा डॅरेल मिशेल आणि मार्कस स्टॉयनिस एकाच संघासाठी एकत्र खेळायचे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे सध्याचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी त्यांच्यासोबत तीनही स्कारबोरोसाठी प्रथम श्रेणी प्रीमियरचा आनंद लुटला होता. पण आता त्या सेलिब्रेशनच्या एका दशकानंतर तो त्या दोघांना T20 वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी लढताना पाहणार आहे.

लहानपणी एकत्र अनेक किताब पटकावले
मार्कस स्टॉयनिस आणि डॅरेल मिशेल यांनी स्कारबोरोसाठी उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत बॅट आणि बॉलने मॅच-विनिंग कामगिरी केली होती. सेमीफायनलमध्ये स्टॉयनिसने 189 धावा केल्या होत्या. दुसरीकडे, मिशेलने 26 धावांत 4 बळी घेतले, दोन्ही खेळाडूंनी सामन्यात चमकदार कामगिरी केली, याच्या जोरावर स्कारबोरोने बेझवॉटर-मॉर्लेचा पराभव करून प्रीमियरशिपचे विजेतेपद पटकावले.

आज फायनलचे रस्ते वेगळे
एकेकाळी एकत्र खेळून शालेय संघाला विजय मिळवून देणारे स्टॉयनिस आणि मिशेल आज दोन वेगवेगळ्या संघांसाठी विजयाचे ढोल बडवताना दिसणार आहेत. मिशेल अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघासाठी आपली ताकद दाखवताना दिसणार आहे, तर स्टॉयनिस ऑस्ट्रेलियासाठी अशीच कामगिरी करेल.

डॅरेल मिशेल उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या इंग्लंडविरुद्धच्या विजयाचा हिरो ठरला. त्‍याने टूर्नामेंटमध्‍ये 72 धावांची मोठी खेळी खेळली. उपांत्य फेरीपर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांमध्ये त्याने 197 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट 140 च्या वर आहे. त्याच वेळी, मार्कस स्टॉयनिसने 6 सामन्यांच्या 4 डावात 80 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 40 आहे. फलंदाजीत स्टॉइनिसचा स्ट्राईक रेट 138 च्या आसपास राहिला आहे. एकूणच, 2021 च्या T20 विश्वचषकातील स्टॉइनिसपेक्षा मिशेलची कामगिरी अधिक मजबूत आहे. आता आजच्या फायनलमध्ये कोण कोणावर मात करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *