‘या’ शहरात पुन्हा Lockdownचं सावट, शाळा बंद, कर्मचाऱ्यांचं वर्क फ्रॉम होम सुरू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ नोव्हेबर । राजधानी दिल्लीत कोरोनासोबत प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. यासाठी दिल्ली सरकारने अनेक पावले उचलली आहेत. प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले, त्यानंतरच दिल्ली सरकारने पुढील 1 आठवड्यासाठी शाळा बंद ठेवल्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना दिल्या. प्रदूषणामुळे दिल्लीतील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की सर्वोच्च न्यायालयाला कडक निर्देश द्यावे लागले. दिल्ली सरकारला तातडीची बैठक बोलावून अनेक मोठे निर्णय घ्यावे लागले.

प्रदूषणामुळे फटकारताना सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, लोक मास्क घालून घरोघरी फिरत आहेत. दिल्लीत लॉकडाऊनच्या गरजेबरोबरच न्यायालयाने शाळा सुरू करण्यावरही नाराजी व्यक्त केली. याचा मुलांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

प्रदूषणाच्या मुद्द्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद कोजरीवाल यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार सोमवारपासून दिल्लीत शाळा बंद राहणार आहेत. शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू राहणार आहेत. 14-17 नोव्हेंबर दरम्यान बांधकाम साइट्स बंद राहतील.

सर्व सरकारी कार्यालये काही दिवस बंद राहणार आहेत. सरकारी कार्यालयातील कर्मचारी घरून काम करतील. खासगी कार्यालयांसाठीही अॅडव्हायझरी जारी केली जाईल. तसेच, लॉकडाऊनच्या अंमलबजावणीचा विचार केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *