न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाची मॅच, भारत पाकिस्तानसारखी का होते? काय आहे स्पेशल कारण?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ नोव्हेबर । T20 विश्वचषक 2021 चा अंतिम सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (NZ vs AUS) यांच्यात खेळवला जाईल. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टशन, शत्रुत्व, फाईट, रोमांच काहीसा भारत आणि पाकिस्तान यांच्यात जसा असतो तसाच आहे. 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ पुन्हा ICC स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

T20 विश्वचषक 2021 चा फायनल मॅच खूपच खास असेल. ही फायनल दोन शेजारी देशांमध्‍ये आहे, जे 6 वर्षांपूर्वी 2015 च्‍या वनडे वर्ल्ड कपच्‍या फायनलमध्‍येही आमने-सामने आले होते. या फायनलमुळे टी-20 फॉरमॅटला नवा वर्ल्ड चॅम्पियन मिळणार आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेतील दोन बलाढ्य संघांना पराभूत करुन क्रिकेटच्या तज्ज्ञांचे सर्व अंदाज खोटे ठरवले आणि अंतिम फेरीत धडक मारली. पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने इंग्लंडचा ५ विकेट्स राखून पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ५ विकेट्स राखून पराभव केला.

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये वैर का?
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियापासून सुमारे 1500 किमी अंतरावर आहे आणि दोन्ही देशांच्या दरम्यान तस्मानिया समुद्र आहे. न्यू कॅलेडोनिया, फिजी आणि टोंगासारख्या इतर बेटांपासून ते सुमारे एक हजार किलोमीटर दूर आहे. न्यूझीलंड देश इतका दूर आहे की मानवी वस्तीही खूप दिवसांनी इथे पोहोचली. न्यूझीलंडच्या अधिकृत वेबसाइटनुसार, येथील इतिहास नेत्रदीपक आहे, ज्यामध्ये माओरी आणि युरोपियन संस्कृतीचे मिश्रण आढळते. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही देश टास्मान समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहेत. तस्मान समुद्र दोन देशांच्या मध्ये आहे. या कारणास्तव या दोघांचा इतिहास ट्रान्स-टास्मान या नावाने पाहिला जातो. बरेच लोक न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाचा भाग मानतात, जो न्यूझीलंडच्या कोणत्याही नागरिकाला आवडत नाही. खेळाच्या मैदानावरही न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीची स्पर्धा असते.

क्रिकेटशिवाय रग्बीमध्येही चुरशीची स्पर्धा आहे
1930 पासून राष्ट्रकुल स्पर्धेत दोन्ही देश एकमेकांविरुद्ध लढत आहेत. क्रिकेटशिवाय रग्बी, नेट बॉल, हॉकीसह इतर खेळांमध्येही दोन्ही देशांमधील वैर खूप आवडते. नैसर्गिक सौंदर्याबद्दल बोलायचे झाले तर, न्यूझीलंडमध्ये आपल्या डोळ्याचे पारणे फिटल्यावाचून राहत नाही. बर्फाच्छादित हिमनद्या, हिरवे पर्वत, सुंदर मैदाने, तलाव-सरोवरे, निळे आकाश आणि समुद्र किनारा, सर्व काही तुम्हाला इथे बघायला मिळेल.

ऑस्ट्रेलियाने 5 वेळा विश्वचषक जिंकलाय
ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत पाच विश्वचषक जिंकले आहेत, परंतु विशेष म्हणजे त्यांना अद्याप T20 विश्वचषक ट्रॉफी जिंकता आलेली नाही. दुसरीकडे, आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडने नेहमीच सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे आणि आता केन विल्यमसनच्या सक्षम नेतृत्वाखाली पुढे जाण्याचा आत्मविश्वास त्यांच्याकडे असल्याचे दिसते.

न्यूझीलंडचा पहिला T20 फायनल
न्यूझीलंडची पहिलीच T20 विश्वचषक फायनल असेल आणि जर न्यूझीलंडने फायनल मारली तर न्यूझीलंडच्या प्रत्येक नागरिकासाठी ती अभिमानाची गोष्ट असेल. ऑस्ट्रेलियाने सध्याच्या जागतिक कसोटी चॅम्पियनवर नेहमीच वर्चस्व राखले आहे. पण न्यूझीलंडने 2016 च्या विश्वचषकातील त्यांचा एकमेव सामना भारतात जिंकला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *