महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ नोव्हेबर । 19 नोव्हेंबर म्हणजे शुक्रवारी यंदाच्या वर्षातलं शेवटचं ग्रहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण अनेक अर्थांनी खूप महत्वाचे मानले जातं. वास्तविक, हे चंद्रग्रहण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होत आहे, ज्याला कार्तिक पौर्णिमा देखील म्हणतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी कार्तिक महिना संपत आहे.
हे चंद्रग्रहण 580 वर्षांनंतर होणार आहे. हे शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण असल्याचं मानलं जात आहे. हे चंद्रग्रहण गेल्या 580 वर्षांतील सर्वात मोठं आंशिक चंद्रग्रहण असेल. ग्रहणाचा कालावधी सुमारे साडेतीन तासांचा असेल. भारतात चंद्रग्रहण दुपारी 12:48 ते 04:17 मिनिटांपर्यंत राहील.
सुतक लागणार नाही
आंशिक चंद्रग्रहण आहे, त्यामुळे ग्रहण काळात कोणतेही सुतक लागणार नाही. ज्योतिषांच्या मते चंद्रग्रहणाचा भारतावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. कारण हे आंशिक म्हणजेच छायाग्रहण आहे, त्यानंतर सुतक कालावधी लागणार नाही. जर संपूर्ण चंद्रग्रहण असेल तर ग्रहण कालावधी सुरू होण्याच्या 9 तास आधी सुतक लागू शकतो.
या तीन राशींना राहवं लागणार सावधान
मेष- चंद्रग्रहणाचा प्रभाव तुमच्या राशीवरही दिसून येईल. पैसा आणि आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्या. महत्त्वाची कामे घाईत करणे टाळा आणि या काळात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका.
वृषभ- यंदाच्या वर्षी लागणाऱ्या चंद्रग्रहणाचा परिणाम वृषभ राशीवर देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना सतर्क राहण्याची अत्यंत गरज आहे. वाद टाळा, कोणत्याही गोष्टीचा अधिक तणाव घेवू नका. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. राग, अहंकार आणि गोंधळापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
सिंह- कृतिका नक्षत्रात चंद्रग्रहण होत आहे. कृत्तिका नक्षत्राचा स्वामी सूर्य आहे. सूर्य तुमच्या राशीचाही स्वामी आहे. त्यामुळे स्वभावात नम्रता आणि वाणीत गोडवा ठेवा. अधिकारांचा गैरवापर करू नका.
या गोष्टींची घ्या काळजी
या ग्रहणाचा परिणाम भारतावर होणार नाही. पण जाणकारांनी ग्रहणादरम्यान पूजा करण्याचा सल्ला दिला आहे. ग्रहण संपल्यानंतर अंघोळ करा. जर तुम्ही गरोदर आहात तर विशेष काळजी घ्या…