लहान मुलांना जानेवारीपासून लसीकरण ; 2 ते 17 वर्षांच्या मुलांना COVAXIN चा डोस !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ नोव्हेबर । कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट ओसरल्यानंतर नागरिकांमधील बेशिस्तपणा वाढला आहे. मार्च-एप्रिलमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, या पार्श्‍वभूमीवर दोन ते 17 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचे (Covid-19 Vaccination) नियोजन केले जात आहे. त्यांना कोवॅक्‍सिन (Covaxin) व झायडस कॅडिला (Zydus Cadila) लस (Vaccine) टोचली जाणार असून, त्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. परंतु, अजूनपर्यंत परवानगी मिळाली नसून साधारणपणे जानेवारीपासून या वयोगटातील मुलांना लस टोचली जाईल, अशी माहिती टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी दिली.

कोरोनामुक्‍त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 18 वर्षांवरील सर्वांना प्रतिबंधित लस मोफत टोचली जात आहे. कोवॅक्‍सिन लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा तर कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना 84 दिवसांनंतर दुसरा डोस टोचला जातो. लस घेतल्याचा सकारात्मक परिणाम समोर आला असून, त्यासाठी पुणे, सोलापूर, औरंगाबाद, नगर, नागपूर यासह अन्य जिल्ह्यांमध्ये सिरो सर्वेदेखील करण्यात आला. लस घेतलेल्या व न घेतलेल्यांमधील रोगप्रतिकारक शक्‍तीचा अंदाज घेण्यात आला. पॉझिटिव्ह तथा कोरोना मृतांमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांची संख्या खूपच कमी असल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्‍वभूमीवर आता दोन ते 17 वयोगटातील मुला-मुलींनाही लस टोचण्याचे नियोजन केले जात असून, परवानगीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. या वयोगटातील मुलांच्या नोंदीसाठी केंद्राला ‘कोविन’ ऍपमध्ये फेरबदल करावा लागणार आहे. त्याचे काम सुरू असून काही दिवसांत परवानगी मिळेल, असा विश्‍वास डॉ. ओक यांनी यावेळी व्यक्‍त केला. 2 ते 17 वयोगटातील मुलांना 28 दिवसांच्या फरकाने कोवॅक्‍सिनचे दोन डोस टोचले जातील. झायडस कॅडिला लसीचाही कालावधी तेवढाच राहणार आहे.

 

आता तुमच्या हाॅस्पिटलचा खर्च आम्ही करणार !

😊विचारात पडलात ना ?

💶दररोजची वाढती महागाई,🏃दररोज मशीनप्रमाणे धावपळीने होणारी दगदग,
💊न परवडणारी औषधे व विविध तपासण्या,हाॅस्पिटलचा अमाप खर्च व या सर्व गोष्टींमुळे जीवनात वाढता तणाव….!
*तेव्हा या सर्व हॉस्पिटल खर्चाचा बोजा सोपवा *
आणि जगा चिंतामुक्त जीवन
एक आरोग्य विमा योजना… तुमच्या संपूर्ण कटुंबासाठी !
👉मेडिक्लेम व इन्शुरन्स👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *