लसीकरणासाठी अधिकाऱ्यांची नवी शक्कल ; आधी दोन डोस नंतरच दारू ढोस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ नोव्हेबर । देशात लसीकरणाचा वेग चांगला असला तरी अनेकांनी दुसऱ्या डोसकडे दुर्लक्ष केलं आहे. अशावेळी दोन डोस पूर्ण करण्यासाठी सरकार, प्रशासन वेगवेगळे प्रयत्न करत आहेत, वेगवेगळ्या युक्त्या योजल्या जात आहेत.

मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात अशीच एक शक्कल लढवण्यात आली आहे. खंडवा जिल्हा उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी एक आदेश काढला. या आदेशानुसार दारूच्या दुकांनाना स्पष्ट सांगण्यात आले आहे की, ‘ज्यांना कोविड लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत अशा लोकांनाच दारूच्या दुकानात दारू विकली जाईल.’

या आदेशामुळे लसीकरणाचा वेग वाढेल अशी अपेक्षा अधिकाऱ्यांना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *