Delhi Air Pollution: आजही दिल्ली-NCR ची हवा ‘अत्यंत गरीब’ श्रेणीत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० नोव्हेबर । देशाची राजधानी दिल्ली (Delhi)आणि NCR मधील वायू प्रदूषणाची (Air Pollution) स्थिती अजूनही गंभीर बनत चालली आहे. SAFAR-India नुसार, शनिवारी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) देखील ‘अत्यंत खराब’ श्रेणीमध्ये 355 वर होता. याआधी शुक्रवारीही हवेची गुणवत्ता (AQI) ‘अत्यंत खराब’ श्रेणीत 380 नोंदवली गेली होती. हवेच्या गुणवत्तेची सतत चिंताजनक परिस्थिती असताना, येथील लोक स्वच्छ हवेसाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या एअर क्वालिटी मॉनिटरिंग सेंटर ‘सफर’ नुसार, 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान वाऱ्याचा वेग सुधारण्याची शक्यता आहे. दरम्यान, राजधानीत शुक्रवारी सफरनुसार, गेल्या 24 तासांत पेंढा जाळण्याच्या 1077 घटना घडल्या आहेत. ज्याचा प्रदूषणात 3 टक्के वाटा होता. दरम्यान AQI काही दिवस अत्यंत खराब श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, SAFAR नुसार, ‘तुलनेने जोरदार वाऱ्यांमुळे 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान ते कमी होण्याची अपेक्षा आहे, मात्र ते खराब आणि अत्यंत खराब श्रेणीत राहील. यादरम्यान, शुक्रवारी वातावरणातील PM 10 ची पातळी खराब 313 आणि PM 2.5 ची पातळी अत्यंत खराब 191 वर होती.

AQI 300 ते 400 मायक्रोग्राम प्रति घनमीटर असल्यास AQI ‘आपत्कालीन’ श्रेणीत असेल. शून्य आणि 50 मधला AQI ‘चांगला’, 51 आणि 100 मधला ‘समाधानकारक’, 101 आणि 200 मधला ‘मध्यम’, 201 आणि 300 मधला ‘खराब’, 301 आणि 400 मधला ‘खूप खराब’ मानला जातो. 401 आणि 500 ​​मधील AQI ‘गंभीर’ श्रेणीमध्ये मानला जातो.

राजधानीतील वायू प्रदूषणाच्या भीषण परिस्थितीवर सर्वोच्च न्यायालयानंही या प्रकरणाची दखल घेतली. त्यानंतर दिल्ली सरकारने (Delhi Government) तातडीने पावले उचललण्यास सुरुवात केली. येथील शाळा, महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचवेळी, 21 नोव्हेंबरपर्यंत पाडकाम आणि बांधकाम कामांवरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, दिल्ली सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना रविवारपर्यंत घरून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या ट्रकवरही अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या ट्रकलाच प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, दिल्लीतील वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी सरकारनं येथे सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्याचे सांगितले आहे. त्यासाठी 1000 सीएनजी खासगी बस भाड्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता तुमच्या हाॅस्पिटलचा खर्च आम्ही करणार ! विचारात पडलात ना ? दररोजची वाढती महागाई,दररोज मशीनप्रमाणे धावपळीने होणारी दगदग, न परवडणारी औषधे व विविध तपासण्या,हाॅस्पिटलचा अमाप खर्च व या सर्व गोष्टींमुळे जीवनात वाढता तणाव….! *तेव्हा या सर्व हॉस्पिटल खर्चाचा बोजा सोपवा * आणि जगा चिंतामुक्त जीवन एक आरोग्य विमा योजना… तुमच्या संपूर्ण कटुंबासाठी ! मेडिक्लेम व इन्शुरन्स

9226262899

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *