सावधान! फसवणुकीबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना इशारा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० नोव्हेबर । स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना फसवणुकीबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत ग्राहकांना सावध केले आहे. बँक तपशील, एटीएम किंवा यूपीआय पिन कोणाशीही शेअर करू नका. खरं तर, भेटवस्तू (Gift) प्रकरणातील बनावट लिंकवर क्लिक करून अनेक वेळा लोक फसवणुकीचे बळी ठरतात. त्यामुळे ग्राहकांनी सावध राहावे, असे एसबीआयच्या वतीने सांगण्यात आले आहे.

बँक किंवा त्यांचे कर्मचारी तुम्हाला खाते क्रमांक, डेबिट कार्ड तपशील आणि इंटरनेट बँकिंग संबंधित माहिती यासारखी कोणतीही माहिती विचारत नाहीत असे एसबीआयने म्हटले आहे. त्याच वेळी, बँक OTP मागत नाही किंवा फोन, एसएमएस किंवा ईमेलद्वारे थर्ड पार्टी लिंकवर क्लिक करण्यास सांगत नाही. काही सायबर ठग ग्राहकांना एसबीआयच्या नावाने मेसेज करून माहिती विचारत आहेत. त्यामुळे एसबीआयच्या नावाने कोणत्याही व्यक्ती किंवा थर्ड पार्टीच्या माध्यमातून अशी माहिती मागवण्यात आलेले मेसेज आले तर सावध व्हा, असा इशारा बँकेकडून देण्यात आला आहे.

आता तुमच्या हाॅस्पिटलचा खर्च आम्ही करणार ! विचारात पडलात ना ? दररोजची वाढती महागाई,दररोज मशीनप्रमाणे धावपळीने होणारी दगदग, न परवडणारी औषधे व विविध तपासण्या,हाॅस्पिटलचा अमाप खर्च व या सर्व गोष्टींमुळे जीवनात वाढता तणाव….! *तेव्हा या सर्व हॉस्पिटल खर्चाचा बोजा सोपवा * आणि जगा चिंतामुक्त जीवन एक आरोग्य विमा योजना… तुमच्या संपूर्ण कटुंबासाठी ! मेडिक्लेम व इन्शुरन्स

9226262899

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *