पुण्यात थंडी गायब; उकाड्यात वाढ

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० नोव्हेबर । पुणे शहर आणि परिसरातून थंडी गायब झाली आहे. ऐन हिवाळ्यात होणाऱ्या पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सध्या किमान तापमानात ही वाढ दिसून येत आहे. परिणामी पुणे शहरात उकाडा काही प्रमाणात वाढला आहे. शुक्रवारी शहरात २१.५ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. सरासरीच्या तुलनेत ७ अंश सेल्सिअसने वाढ झाली होती.

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात किमान तापमानात सातत्याने घट नोंदली गेली. किमान तापमान हे १५ अंश सेल्सिअसच्या खाली नोंदले जात होते. मात्र, त्यानंतर शहरातील किमान तापमानात लक्षणीय वाढ होत गेले. सध्या शहर आणि परिसरात सामान्यतः ढगाळ वातावरण कायम राहणार असून पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुणेकरांची थंडीची प्रतिक्षा कायम राहणार आहे.

जिल्ह्यातील बदलत्या वातावरणामुळे शेतकरी देखील हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील काही भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे काही प्रमाणात नुकसान होत आहे. पुढील चार दिवस जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

 

आता तुमच्या हाॅस्पिटलचा खर्च आम्ही करणार ! विचारात पडलात ना ? दररोजची वाढती महागाई,दररोज मशीनप्रमाणे धावपळीने होणारी दगदग, न परवडणारी औषधे व विविध तपासण्या,हाॅस्पिटलचा अमाप खर्च व या सर्व गोष्टींमुळे जीवनात वाढता तणाव….! *तेव्हा या सर्व हॉस्पिटल खर्चाचा बोजा सोपवा * आणि जगा चिंतामुक्त जीवन एक आरोग्य विमा योजना… तुमच्या संपूर्ण कटुंबासाठी ! मेडिक्लेम व इन्शुरन्स

9226262899

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *