महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० नोव्हेबर । यावर्षी ऐन दसरा आणि दिवाळीच्या काळात सोने आणि चांदीच्या (Gold Price Rate) दरात चढ-उतार दिसून आले. सोन्याच्या दरात दिवाळीदरम्यान काही प्रमाणात घट झाली. मात्र आता या किंमती काही प्रमाणात वाढण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे लग्नसराईदरम्यान सोने खरेदीचा तुमचा विचार असेल तर ही संधी सोडू नका, असा सल्ला जाणकार देत आहेत. तज्ज्ञांच्या मते, दिवाळीच्या काळात (Diwali Festival) सोन्याची भरपूर खरेदी झाली. तसेच लग्नसराईचाही मौसम सुरु आहे. त्यामुळे वाढत्या सोन्या-चांदीच्या मागणीने दरांनाही आधार मिळतो. त्यामुळे सोन्याचे दर पुन्हा हळू हळू 50 हजारांच्या पातळीकडे जात आहेत.
गुडरीटर्न साईट नुसार आज सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्याचे दर 48,100 रुपये प्रति तोळा, 24 कॅरेटचे दर 49,100
पुण्यात शुद्ध चांदीचे भाव 65600 रुपये एवढा आहे .