अवघ्या 68,000 रुपयांत खरेदी करू शकता ; Darwin ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, शानदार फीचर्ससह लाँच

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २२ नोव्हेंबर । इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता डार्विन (Darwin) प्लॅटफॉर्म ग्रुप ऑफ कंपनीज् ने भारतात D-5, D-7 आणि D-14 या तीन नवीन इलेक्ट्रिक दुचाकी लाँच केल्या आहेत. कंपनीने या तिन्ही इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल्सला अनेक फिचरसह बाजारात आणले आहे, ज्यात शानदार डिझाइन, उत्तम सस्पेन्शन आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग यांचा समावेश आहे. या तिन्ही ईव्हीची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे 68,000 रुपये, 73,000 रुपये आणि 77,000 रुपये ठेवण्यात आली आहे. एका चार्जवर ही इलेक्ट्रिक स्कूटर 70 ते 120 किमीपर्यंत चालवता येते.

दरम्यान, ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सना बाजारात चांगलीच पसंती मिळत असून, S1 आणि S1 Pro ला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. या दोन्हीच्या किंमती अनुक्रमे 1 लाख आणि 1.30 लाख रुपये आहेत. यामध्ये कंपनीने S1 Pro सोबत अधिक पॉवरफुल बॅटरी बसवली आहे आणि एका चार्जवर ती 181 किमी पर्यंत चालेल असा दावा केला जात आहे. डार्विनच्या स्कूटर्स ओला इलेक्ट्रिक स्कूटर्सपेक्षा खूपच स्वस्त आहेत आणि या मोठ्या प्रमाणात परवडणाऱ्या स्कूटर्स ग्राहकांसाठी बाजारात आल्या आहेत.

सिम्पल वन (Simple One) आणि एथर एनर्जी देखील त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरसह बाजारात आहेत आणि ओला ईव्हीशी स्पर्धा करत आहेत. येथे सिम्पल वन इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.10 लाख रुपये आहे, तर एथर 450X ची एक्स-शोरूम किंमत 1.32 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. यानंतर, बजाज चेतकची ईव्ही 1.25 लाख ते 1.27 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध करून देण्यात येत आहे, तर TVS iCube ची किंमत 1 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

दुसरीकडे, Bounce Electric लवकरच आपली इलेक्ट्रिक स्कूटर इन्फिनिटी भारतात लाँच करणार आहे. 2 डिसेंबर रोजी ही स्कूटर लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली. ज्या दिवशी ही स्कूटर लाँच केली जाईल त्याच दिवसापासून याचं बुकींगही सुरू करण्यात येणार आहे. लाँच नंतर कंपनी पुढील वर्षापासून या स्कूटरची डिलिव्हरी सुरू करेल. ओला प्रमाणेच बाऊन्स इलेक्ट्रीक स्कूटरचे देखील बुकींग 499 रूपयांच्या टोकन रकमेवर सुरू करेल. Bounce Infinity स्कूटरसोबत स्मार्ट आणि वेगळी होणारी लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. गरज भासल्यास ही बॅटरी स्कूटरपासून वेगळी केली जाऊ शकते. याशिवाय गरजेनुसार ही बॅटरी चार्जही करता येऊ शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *