महाराष्ट्र 24-वाशिंग्टन :
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. चीनमधून या व्हायरसची सुरुवात झाली आहे. चीनमध्ये ८० हजार ५५२ लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. अमेरिकेतही कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. यातच धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेत सध्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. एका प्रचार सभेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण सुरू होते. यावेळी एका चाहत्याने त्यांच्याशी हस्तांदोलन केले. पण नंतर या चाहत्याची चाचणी केल्यानंतर तो कोरोना पॅाझीटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गोंधळ उडाला आहे, असे वृत्त अमेरिकन माध्यमांनी दिले आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रंप यांची सुद्धा कोरोनाची चाचणी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोरोनामुळे अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारसंभांवर आता निर्बंध येण्याची शक्यता आहे. त्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वॉशिंग्टन राज्यात कोरोना व्हायरसमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत अमेरिकेत १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये सध्या ८९ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून १९ झाला आहे. न्यूयॉर्कचे गव्हर्नर एन्ड्रयू कुओमो यांनी सांगितले की, शनिवारी राज्यात १३ नवीन प्रकरणं समोर आली आहेत. ज्यामुळे रुग्णांचा आकडा ८९ पर्यंत पोहोचला आहे.