कानपूर कसोटी: कोच द्रविडने खेळला पहिला डाव; हा खेळाडू येणार सलामीला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ नोव्हेंबर । न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघ कसोटीसाठीची रणनिती आखत आहे. पहिली कसोटी २५ नोव्हेंबर रोजी कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर होईल. भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कसोटीसाठी योजना तयार करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या कसोटीसाठी विराट कोहली उपलब्ध असणार नाही. तर सलामीवीर रोहित शर्मा दोन्ही कसोटीत खेळणार नाही. यामुळे सलामीची जोडी कोण असेल असा मोठा प्रश्न भारतीय संघासमोर आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघ व्यवस्थापनाने शुभमन गिलच्या फलंदाजीचा क्रम बदलण्याचा विचार करत आहे. सलामीसाठी केएल राहुल सोबत भारताकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत.एक मयांक अग्रवाल आणि दुसरा शुभमन गिल होय. यापैकी अग्रवालचे नाव जवळ जवळ पक्के मानले जात आहे. कारण पहिल्या कसोटीसाठी विराट कोहली उपलब्ध नाही. त्यामुळे त्याच्या जागी एका फलंदाजाची गरज आहे तो गोलंदाजांवर दबाव टाकू शकले. भारतीय संघ व्यवस्थापनाच्या मते शुभमनमध्ये ती ताकद आहे. तो प्रतिस्पर्धी संघावर आक्रमकपणे दबाव आणू शकतो.

अग्रवाल आणि गिल यांचा विचार केल्यास गिलने आतापर्यंत फक्त ८ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३१.८४च्या सरासरीने ४१४ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ३ अर्धशतक देखील आहेत. शुभमन असा भारतीय फलंदाज आहे जो अनेक वेळा स्विंग गोलंदाजीवर फलंदाजी करता येत नाही. गिलने त्याची अखेरची कसोटी न्यूझीलंडविरुद्द WTC फायनल खेळली होती. तर अग्रवालने शेवटची कसोटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळली होती. शुभमन दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. तर अग्रवाल संघासोबतच होता. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत राहुल आणि रोहित यांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे या दोघांना संधी मिळाली नव्हती.

शुभमन दुखापतीमुळे बाहेर होण्याआधी त्याचा फॉर्म खराब होता. ऑस्ट्रेलिया दौरा वगळता त्याला फार चांगली कामगिरी करता आली नाही. सात सामन्यात १९.८३च्या सरासरीने ११९ धावा करता आल्या. WTC फायनलमध्ये त्याला ३६ धावा करता आल्या. या उटल मयांक अग्रवाल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. त्याने भारतातील ५ सामन्यातील ६ डावात ९९.५०च्या सरासरीने २४३ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १४ कसोटीत ४५.७३च्या सरासरीने १ हजार ५२ धावा केल्या आहेत. यात ३ अर्धशतक आणि ४ शतकांचा समावेश आहे. या दोन्ही फलंदाजांची आकडेवारी पाहता मयांक अग्रवालचे पारडे जड वाटत आहे. अशात राहुल सोबत त्याची निवड केली जाऊ शकते.

संघातील चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर हा देखील एक पर्याय आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघात मोठे बदल दिसू शकतात. राहुल द्रविड यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतरची ही पहिलीच कसोटी मालिका आहे. त्यामुळे संघातील बदल काय होतात याची सर्वांना उत्सुकता आहे. कर्णधाराने मैदानावर जाण्याआधी कोचची भूमिका महत्त्वाची ठरते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *