महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ नोव्हेबर । राजे शाहू महाराज यांचे वंशज सन्माननीय खासदार युवराज संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते काल पिंपरी चौकात शिक्षणाचे जनक क्रांतीसुर्य महात्मा फुले व ज्ञान ज्योती सावित्रीमाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभारुन फुले सृष्ट उभारण्यासाठी संबधीत जागेचे भूमिपूजन झाले….सदर प्रसंगी महापौर माई ताई ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष अॅड नितीन लांडगे, मा. स्थायी समिती अध्यक्ष संतोष अण्णा लोंढे , सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके,नगरसेवक तुषार हिंगे, मा.उप महापौर केशव घोळवे,अनेक संघटनाचे पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य फुले अनुयायी उपस्थित होते…..सदर भूमिपूजनाचे आयोजन पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतर्फे करण्यात आले.