महाराष्ट्र 24 – पुणे
जर तुम्ही हायवेवर वाहन चालवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला हायवेवर वाहन चालवण्याबाबतच्या काही टिप्स सांगणार आहोत. ज्या तुमच्या खूप कामी येऊ शकतात. हायवेवर वाहन चालवणे हे सामान्य रस्त्यांवर वाहन चालवण्यापेक्षा वेगेळे असते. जेव्हा आपण हायवेवर वाहन चालवत असतो तेव्हा आपल्याला अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या हायवेवर गाडी चालवताना लक्षात ठेवणे खूप आवश्यक आहेत.
हायवेवर वाहन चालवताना दुसर्या बाजूला जाण्याआधी टर्न इंडिकेटर देणे आवश्यक असते. कारण यामुळे तुमच्या वाहनाच्या मागे चालत असलेल्या वाहनांना तुम्ही कोणत्या बाजूला वाहन वळवणार आहोत हे कळते. हायवेवर वाहनाची गती नियंत्रित ठेवणे गरजेचे असते. कारण जर आपण हायवेवर कमी गतीत वाहन चालवित असाल, तर कदाचित वेगाने मागून येणारे वाहन आपल्या वाहनास धडकू शकते. म्हणून हायवेवर वाहन चालवताना एक गती निश्चित करा ( 80-100 प्रति किमी वेग ) आणि त्याच वेगाने वाहन चालवा. जर तुम्ही हायवेवरून दूर कुठे जाण्याचा विचार करत असतात, तर तुम्ही तुमच्या वाहनाची काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वात आधी तर वाहनाची सर्व्हिसिंग करून घ्या. जेणेकरून तुम्हाला वाहनात कुठल्याही प्रकारचा काही बिघाड असल्यास तुम्हाला तो दुरुस्त करता येईल. उदा. टायर्स, रेन वयपर्स, इंजिन आदी.