महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ नोव्हेबर । पुणे – मावळ तालुक्यातून कार्तिकी एकादशीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला मोठा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये 15 ते 20 वारकरी जखमी झाले असून दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे. खालापूर येथून ही पायी दिंडी आळंदीला निघाली होती, तेव्हा कान्हे फाटा येथे सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे.