महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ नोव्हेंबर । सार्वजिनक सुट्टयांमुळे पुढील महिन्यात देशातील खासगी आणि सार्वजनिक बँका, सहकारी बँका तब्बल १२ दिवस बंद राहणार आहेत. बँकिंग कामाचे नियोजन करण्यासाठी ग्राहकांना नियोजन करावे लागेल, अन्यथा गैरसोय होण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँकेच्या वेळापत्रकानुसार डिसेंबर २०२१ मध्ये देशातील बॅंकाचे कामकाज १२ दिवस बंद राहणार आहे. यात ५ , १२, १९ आणि २६ डिसेंबर २०२१ रोजी रविवार आहे. ११ डिसेंबर रोजी दुसरा शनिवार असल्याने बँक बंद राहतील. याव्यतिरिक्त विविध राज्यांमध्ये स्थानिक पातळीवरील सण उत्सव आणि जयंती यामुळे बँकांना सुट्टी राहील. त्यामुळे बँकांना ७ दिवस सार्वजनिक सुट्टी राहील तर उर्वरित पाच दिवस शनिवार-रविवार असतील.
बँकांना पुढील महिन्यात अशा सुट्ट्या असतील
– ३ डिसेंबर २०२१ – सेंट फ्रान्सिस यांचा उत्सव , पणजीमध्ये बँका बंद राहतील.
– ५ डिसेंबर – रविवार
– ११ डिसेंबर – महिन्यातील दुसरा शनिवार बँक बंद
– १२ डिसेंबर – रविवार
– १८ डिसेंबर – यू सो सो थाम यांची पुण्यतिथी , शिलॉंगमध्ये बँकांना सुट्टीअसेल
-१९ डिसेंबर – रविवार
-२४ डिसेंबर – नाताळ सण , आयजोलमध्ये बँकांना सुट्टी
-२५ डिसेंबर – नाताळ सणाची सुट्टी
-२६ डिसेंबर – रविवार
-२७ डिसेंबर – नाताळ सण , आयजोलमध्ये बँकांना सुट्टी
-३० डिसेंबर – यू किआंग नाॅंगबाह , शिलाॅंगमध्ये बँकांना सुट्टी
-३१ डिसेंबर – नव वर्ष पूर्वसंध्या ,आयजोलमध्ये बँकांना सुट्टी