अनिल कपूर जर्मनीमध्ये घेतायेत गंभीर आजारावर उपचार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ नोव्हेंबर । बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर गेल्या काही दिवसांपासून जर्मनीमध्ये आहेत. त्यांनी जर्मनी टूरमधील शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी आज ट्रीटमेंटचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच संदर्भात जर्मनीमधील काही डॉक्टरांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून अनिल कपूर यांना नेमकं काय झालं? असा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे.

अनिल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाचा कोट परिधान केला आहे. या व्हिडीओमध्ये जर्मनीमध्ये बर्फ पडत असल्याचे दिसत आहे आणि अशातच अनिल कपूर तेथील रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘रॉकस्टार’ चित्रपटातील ‘फिर से उड चला’ हे गाणे ऐकू येत आहे.

https://www.instagram.com/anilskapoor/?utm_source=ig_embed&ig_rid=85a37e61-9c78-445e-8f96-16a27ff70628

हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी, ‘बर्फ पडत असताना एक वॉक. जर्मनीमधील एक शेवटचा दिवस. मी डॉ. मुलेर यांना शेवटच्या ट्रीटमेंटसाठी आज भेटणार आहे. त्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मानापासून आभार’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. हे कॅप्शन वाचून अनेकांना अनिल कूपर यांना काय झाले आहे? ते कोणत्या आजाराने त्रस्त आहेत? असे अनेक प्रश्न पडले आहेत.

गेल्या वर्षी अनिल कपूर यांनी सोशल मीडियाद्वारे ऍचिलीस टेंडिनाइटिसने (Achilles Tendinkitis) या आजाराने त्रस्त असल्याचे म्हटले आहे. कोणतीही सर्जरी न करता त्यांनी या आजारावर मात केली होती. आता पुन्हा अनिल कपूर याच आजारावर उपचार घेण्यासाठी जर्मनीला गेलेत का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण अनिल कपूर यांनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *